नागपुरातील गडकरींच्या 'या' प्रकल्पात फडणवीस लक्ष घालताहेत का?

Fadnavis & Gadkari
Fadnavis & GadkariTendernama

नागपूर (Nagpur) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरच्या मेट्रो (Nagpur Metro) रेल्वेस आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुढाकार घेऊन मोठा बूस्टर डोस दिला आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी ९ हजार २७९ कोटींच्या सुधारित खर्चास त्यांनी मंजुरी मिळवून दिली.

Fadnavis & Gadkari
मुंबईतील मेट्रोसाठी सल्लागाराची नेमणूक; २६८ कोटीच्या टेंडरवर मोहोर

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस मेट्रो बद्दल, तर गडकरी समृद्धी महामार्गाबाबत फारसे बोलत नव्हते. दोघांचे काम जोरात सुरू होते. मात्र एकमेकांच्या प्रकल्पात ते हस्तक्षेप करीत नव्हते. समृद्धी बाबत विचारणा केली असताना गडकरी हे देवेंद्र यांना विचारा, असे सांगत होते. दुसरीकडे मुख्यमंत्री असले तरी फडणवीस यांनी विकास कामांचे पालकत्व गडकरी यांच्याकडे सोपवले होते. मेट्रो रेल्वेबाबत प्रशासकीय पातळीवर ते मदत करीत होते, मात्र त्याचे श्रेय घेण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. आता मात्र राजकीय परिस्थिती थोडी बदलल्याचे दिसून येते. फडणवीस आणि गडकरी एकत्र काम करताना दिसत आहे. महापालिका, त्यानंतर होणारी लोकसभेचे निवडणूक दोन्ही नेत्यांनी मनावर घेतली असल्याचे दिसून येते.

Fadnavis & Gadkari
कल्याण-डोंबिवली-टिटवाळा वासियांना MMRDAकडून गुड न्यूज!

महाविकास आघाडीच्या कार्यकाळात नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला फारसी आर्थिक मदत झाली नाही. त्यामुळे बरीच कामे रेंगाळली होती. विलंबामुळे खर्चात वाढ होत चालली होती. हे लक्षात घेऊन टप्पा-१ ला गती देण्यासाठी सुधारित ९२७९ कोटींच्या सुधारित खर्चाचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला व त्याला मान्यताही मिळवून दिली. प्रकल्पाचा मूळ मंजूर खर्च ८६८० कोटी इतका असून, त्यात ५९९ कोटी ६ लाख रुपये इतकी वाढ झाली आहे.

Fadnavis & Gadkari
दोन दशकानंतरही नागपुरात विकास आराखड्यातील रस्ते अपूर्णच

नागपूर मेट्रो रेल टप्पा १-प्रकल्पामध्ये ऑटोमोटीव्ह चौक ते मिहान मार्गिका क्र.१ व प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर ही मार्गिका क्र.२ अशा एकूण ३८.२१५ कि.मी. लांबीच्या दोन मार्गिकांचा व ३८ स्थानकांचा समावेश आहे. या प्रकल्पास २०१४ मध्ये मंजूरी देण्यात आली होती. प्रकल्पाचा मूळ नियोजित बांधकाम कालावधी एप्रिल, २०१३ ते एप्रिल, २०१८ असा ५ वर्षांचा होता. प्रत्यक्षात जून, २०१५ मध्ये कामास सुरवात झाली. या प्रकल्पाच्या एकूण ३८.२१५ कि.मी. लांबीपैकी २६ कि.मी. वर मेट्रो सुरू आहे. प्रकल्पाची उर्वरीत १२ कि.मी. मार्गिका लवकरच कार्यान्वित होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com