Nagpur: सात कोटींचे टेंडर काढून घरात शिरणारे पाणी रोखणार

Nagpur
NagpurTendernama

नागपूर (Nagpur) : घराघरात पावसाचे पाणी शिरू लागल्याने नागपूर सुधार प्रन्यासचे (NIA) पावसाळी नाल्या काढण्यासाठी साडे सात कोटी रुपयांचे टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे. व्हीएनआयाटीचा तपासणीच्या अहवालानुसार याकरिता ७ कोटी २१ लाखांच्या खर्च करण्यात येणार आहे.

Nagpur
तब्बल 1,231 नागपूरकरांना मोठी लॉटरी; केंद्राच्या 'या' योजनेतून...

नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्तमंडळाच्या बैठकीत सर्वांनी या खर्चास मान्यता दिली आहे. अलीकडे रस्त्यांवर पाणी का साचत आहे, ते घराघरांमध्ये का शिरत आहे याचा अभ्यास व्हीएनआयटीमार्फत केला जाणार आहे. व्हीएनआयटीचा अहवाल आल्यानंतर त्यानुसार रस्त्यांच्या कामांमध्ये सुधारण केली जाणार आहे. पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा घरात शिरणाऱ्या पाण्यावर नाराजी व्यक्त केली होती. अधिकाऱ्यांना चांगलेच धारवर धरले होते. लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरणार नाही यासाठी उपयायजोना करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले होते.

Nagpur
'शिंदेजी, आता ठेकेदारांनाही डबघाईस आणू नका; कामांवरील स्थगिती...'

नागपूर शहरामध्ये नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर महानगर पालिका असे दोन विकास प्राधिकरण आहेत. याशिवाय काही रस्ते राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहेत. सुधार प्रन्यासने आपल्या मालकीच्या रस्त्यांसाठी साडेसात कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र साठ टक्के रस्ते नागपूर महापालिकेच्या मालकीचे आहेत. महापालिकेच्यावतीनेच बहुतांश रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले आहे. त्यामुळे रस्त्यांची उंची वाढली व लोकांची घरे खाली गेली आहेत. याशिवाय सिमेंटचे रस्ते करताना पावसाळी पाण्याच्या नाल्या काढण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पाऊस आल्यास रस्त्यावरचे पाणी थेट नागरिकांच्या घरात जात आहे. हे लक्षात घेता पावसा पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी सुधार प्रन्यासपेक्षा नागपूर महापालिकेला अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com