कंत्राटदार सुपर हायजेनिक कंपनी करते काय? घनकचऱ्यात टाकला जातोय...

Bio Waste
Bio WasteTendernama

नागपूर (Nagpur) : महापालिकेकडून केवळ दंडात्मक कारवाई केली जात असल्याने शहरातील लॅब, दवाखाने निर्ढावल्याचे चित्र असून घनकचऱ्यात बिनधास्तपणे जैविक कचरा टाकला जात आहे. त्यामुळे कंत्राटदार सुपर हायजेनिक या कंपनी करते काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Bio Waste
इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतींबाबत गडकरींची मोठी घोषणा; 2023मध्ये...

महापालिकेने जैविक कचरा उचलण्याचे कंत्राट सुपर हायजेनिक या कंपनीला दिले आहे. त्यांची वाहने दररोज दवाखाने, लॅबमधून जैविक कचरा गोळा करीत आहे. सुविधा उपलब्ध असतानाही शहरातील काही लॅब, दवाखाने घनकचऱ्यात जैविक कचरा टाकत असल्याची धक्कादायक बाब आज लक्ष्मीनगर झोनमध्ये उघडकीस आली. महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने छत्रपती चौकातील साई कम्प्युटराईज्ड पॅथॉलॉजी लॅबवर जैविक कचरा घनकचऱ्यात टाकल्याबाबत १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. यापूर्वी एका दवाखान्यावरही अशीच कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे दवाखाने, लॅबवर दंडात्मक कारवाई पुरेशी नसल्याचे अधोरेखित झाले आहे.

Bio Waste
नागपूर, चंद्रपुरात मोठी कोळसा चोरी; कोणी लांबविला 578 मेट्रिक टन..

लॅब, दवाखान्यातील जैविक कचऱ्यामुळे इतर नागरिकांच्या आरोग्यालाही धोका आहे. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. केवळ दंड घेऊन सोडून देण्यात येत असल्याने दवाखाने, लॅब संचालक निर्ढावले असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याचे दिसून येत आहे. घनकचरा गोळा करणारे कर्मचारी इतर वस्त्यांमध्येही कचरा गोळा करण्यासाठी फिरतात. या कर्मचाऱ्यांकडून लॅबमधील कर्मचाऱ्यांना ओळखणे कठीण असते. याचा फायदा घेत लॅबमधील जैविक कचराही घनकचऱ्यात टाकला जातोय. हा कचरा सामान्य नागरिकांच्या वस्तीमध्येही फिरतो, यातून संसर्गजन्य रोगापासून तर भयंकर आजाराचाही धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com