ठेकेदारांनी रस्त्यांखालील ड्रेनेज लाईनच गायब केल्याने तुंबले शहर

Nagpur
NagpurTendernama

नागपूर (Nagpur) : शहरातील सर्वच प्रमुख रस्ते सिमेंटचे तयार करण्यात आले. सिमेंट रस्तेनिर्मितीपूर्वी अनेक रस्त्यांखाली ड्रेनेज लाईन होत्या. सिमेंट रस्ते तयार करताना या ड्रेनेज लाईनचा बळी देण्यात आला. सिमेंट रस्त्यांच्या बाजूला केवळ एक ते दोन फूट खोल नव्या ड्रेनेज लाईन तयार करण्यात आल्या. विशेष म्हणजे कंत्राटदारांनी पैसे वाचविण्यासाठी रस्त्यांखालील नव्या ड्रेनेज लाईन तयार केले नाही, रस्त्याच्या बाजूला तयार करण्यात आलेल्या ड्रेनेज लाईन अधिक खोल करण्याचेही टाळले. याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केले. त्यामुळे यंदा शहर तुंबले असून जागोजागी पाणी साचल्याचे दिसून येत आहे.

Nagpur
शिंदेंचे थेट बारामतीलाच आव्हान; अजित पवारांना धक्का देत रोखला...

शहरात २०११ पासून सिमेंट रस्त्यांचे जाळे तयार करण्यास सुरुवात झाली. पहिला टप्पात १०० कोटी, दुसरा टप्प्यात ३०० कोटी तर तिसऱ्या टप्प्यातही ३०० कोटींचे सिमेंट रस्ते तयार करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील काही रस्ते अजूनही सिमेंटचे झाले नाही. दुसऱ्या टप्प्याचीही हीच स्थिती आहे. तिसऱ्या टप्प्यात ३९ रस्‍त्यांचे रुपांतर सिमेंट रस्त्यात करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात किती रस्ते झाले, हे अद्यापही काही स्पष्ट नाही. काल, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे झालेल्या बैठकीत आमदार प्रवीण दटके यांनी पहिल्या टप्प्यातील रस्त्यांचीही कामे अपूर्ण असल्याचे नमुद केले. त्यामुळे अकरा वर्षांत सातशे कोटींच्या रस्त्यांपैकी किती झाले, याबाबत शंका निर्माण झाली. सिमेंट रस्ते तयार करण्यापूर्वी शहरातील अनेक रस्‍त्यांखाली ड्रेनेज लाईन होत्या. रस्त्याच्या एका बाजूच्या ड्रेनेज लाईनमध्ये अडथळा आल्यास पाण्याचा प्रवाह दुसऱ्या बाजूच्या सिवेज लाईनकडे वळविण्यासाठी रस्त्यांखालील ड्रेनेज लाईन महत्त्वपूर्ण होत्या. त्यामुळे पावसाचे पाणी रस्‍त्यांवर जमा होण्याऐवजी थेट निघून जात होते, असे एका अधिकाऱ्याने नमुद केले. शहरात सिमेंट रस्त्याचे सुरुवातीला एवढे कौतुक झाले की कंत्राटदारांनी मनमानी करीत रस्त्यांच्या खालील ड्रेनेज लाईनचाच बळी दिले. थेट सिमेंट रस्ते तयार करण्यात आले. सिमेंट रस्‍त्यांच्या बाजूला दीड ते दोन फूटापर्यंत खोल ड्रेनेज लाईन तयार करण्यात आल्या. अतिवृष्टी झाल्यास या सिवेज लाईनमधून पाणी निघून जाईल, एवढी क्षमता नसल्याचेही या अधिकाऱ्याने नमुद केले. सिमेंट रस्ते तयार करताना कंत्राटदार काय करतो, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची होती. परंतु त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केल्याने कंत्राटदारांना पैसा वाचविण्यासाठी रस्त्यातील आडव्या असलेल्या ड्रेनेज लाईनच गायब केला. परिणामी यंदाच नव्हे तर दरवर्षी शहरात पाणी साचत असून अऩेक रस्ते जलमय होत असल्याचे आता अधोरेखित झाले आहे.

Nagpur
नागपूर जिल्हा परिषदेतील सुरक्षा ठेव घोटाळा दडपण्याचा प्रयत्न

मेडिकल चौक, सेंट्रल बाजार रोडवर घोळ
मेडिकल चौकात असाच घोळ करून ठेवण्यात आला आहे. संपूर्ण मेडिकल व वंजारीनगर येथील पाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेज लाईन होती. मेडिकल चौकातून इतर ड्रेनेजला जोडण्यात आल्याने मेडिकलमधील संपूर्ण पाणी बाहेर वाहून जात होते. आता ही ड्रेनेजच बंद झाली. त्यामुळे मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. रामदासपेठ सेंट्रल बाजार रोडवर क्रिम्स हॉस्पिटलपर्यंत ड्रेनेज लाईन आहे. त्यामुळे ड्रेनेज लाईनच नाही. त्यामुळे जोरदार पाऊस आल्यानंतर सेंट्रल बाजार रोड स्‍मार्ट पार्किंग परिसरात पाणी साचत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com