स्मार्टसिटी ठेवणार खासगी सीसीटीव्हीचाही बॅकअप; 159 कोटींचा प्रकल्प

CCTV
CCTVTendernama

नाशिक (Nashik) : स्मार्ट सिटी कंपनीतर्फे नाशिक शहरात १५९ कोटींच्या निधीतून महाआयटी कंपनी कंपनीच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे. मधल्या काळात काही कारणाने या कामाची गती कमी झाली होती. आता कामाने वेग घेतला असून मार्च अखेरपर्यंत सर्व ८०० कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण होणार आहेत. या कॅमेऱ्यांप्रमाणेच शहरात खासगी सोसायट्यांनी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा बॅक तीन ते सहा महिने सुरक्षित ठेवण्याचे योजना स्माटॅ सिटी कंपनीने आणली आहे. यामुळे संपूर्ण शहरातील घडामोडींवर स्मार्टसिटीची नजर असणार असून त्या माध्यमातून गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होऊन शहरातील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होणार आहे.

CCTV
चूक नाशिक ZPची, खापर ठेकेदारावर; रोज लाख रुपये दंडांची तयारी

स्मार्टसिटी योजनेतून नाशिक शहरात सर्विलन्स, वाहनांच्या नंबरप्लेट व रात्रीच्या वेळी प्रतिमा घेऊ शकणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे. साधारणपणे ३७१ ठिकाणी ८०० कॅमेरे बसवले जाणार आहेत. तसेच ५० ठिकाणी वायफाय, २० ठिकाणी पब्लिक ॲड्रेस सिस्टिम, २६ ठिकाणी पर्यावरण सेंसर व २० ठिकाणी पूर सेंसर उभाऱण्यात येणार आहे. केंद्र व राज्याच्या सूचनेनुसार १५९ कोटींचे हे काम महाआयटी या कंपनीला चार वर्षापूर्वी दिले असून ते काम पूर्ण करण्यासाठी मार्च २०२३ ची मुदत देण्यात आली आहे. संपूर्ण नाशिक शहर नजरेच्या एका टप्प्यात आणण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने आयटी प्रकल्प अंतर्गत शहरात १६०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, राज्य शासनाच्या महाआयटी कंपनीच्या वतीने त्यात बदल करत सोळाशे ऐवजी ८०० कॅमेरे बसवण्याचे निश्चित करण्यात आले. यामध्ये ३७१ ठिकाणे निश्चित केली असून तेथे ७१२फिक्स बॉक्स कॅमेरे तर ८८  झूम कॅमेरे बसवले जाणार आहे. यातही १५९ ठिकाणी २७८ फिक्स बॉस कॅमेरा इतर ३४ ठिकाणी पॉईंट झूम कॅमेरे बसवण्यात आले आहे. मार्च अखेरपर्यंत शहरात आठशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण होईल. या कॅमेऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच बॅकअप सांभाळण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीकडून स्वतंत्र कक्षाची निर्मितीही केली जात आहे.

CCTV
'टेंपल सिटी' सुशोभीकरणासाठी 140 कोटीचा आराखडा; सल्लागारासाठी टेंडर

सीसीटीव्हीचा बॅकअप
स्मार्ट सिटी कंपनी, महापालिका किंवा पोलीस प्रशासन या सर्व यंत्रणांना मुख्य रस्ते वगळता कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे शक्य नाही. त्यामुळे सोसायटी, कॉलनी तसेच नगरांमध्ये व खाजगी ठिकाणी स्वखर्चाने बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा बॅकअप स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने सांभाळला जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याव्यतिरिक्त बॅकअप सांभाळणे हा खर्चिक भाग असतो प्रत्येकाला हा खर्च परवडणारा नाही त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीने बॅकअप सांभाळण्याची योजना आणली आहे. या योजनेमुळे स्मार्ट सिटी कंपनीतर्फे उभारण्यात आलेल्या सीसीटीव्हीव्यतिरिक्त इतर कॅमेऱ्यांचाही डेटा तपास यंत्रणांना उपलब्ध होऊ शकणार आहे. यामुळे गुन्हेगारीची उकल होण्यास मदत होऊन शहरातील गुन्हेगारी कमी होण्यास मदत होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com