नाशिक झेडपीत नियमाने काम वाटपांचा आमदारांचा फटका

Nashik Z P
Nashik Z PTendernama

नाशिक (Nashik) : जिल्हा परिषदेत आमदार, खासदार निधी व पंधराव्या वित्त आयोगातील निधीचे जवळपास साडेतीन कोटींच्या ३९ कामांचे वाटप काम वाटप समितीकडून करताना नियमांचे काटेकोर पालन केले जात असल्याचे बघून नाशिकरोड-देवळाली व इगतपुरी- त्र्यंबकेश्‍वरच्या आमदारांनी या काम वाटपातून त्यांनी प्रस्तावित केलेली कामे वगळून घेतली. यामुळे केवळ १२ कामांचे वाटप होऊ शकले. आमदारांनी बांधकाम विभागावर केलेल्या आरोपांनंतर जिल्हा परिषदेत पारदर्शकतेचे पर्व सुरू झाले असून, त्याचा पहिलाच फटका आरोप करणाऱ्या आमदारांना बसला आहे. यामुळे या आमदारांनी प्रस्तावित केलेली कामे काम वाटप समितीच्या वगळल्याचीच जिल्हा परिषदेत चर्चा आहे.

Nashik Z P
सुशोभीकरणाच्या ३० कोटींच्या टेंडरमध्ये घोटाळा; ठेकेदारास पायघड्या?

पालकमंत्री भुसे यांनी जिल्हा परिषदेत घेतलेल्या आढावा बैठकीत आमदार हिरामन खोसकर यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नियमांचे पालन करीत नसून ठेकेदारांचे शोषण करतात, असा आरोप केला होता. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून नियमांचे पालन केले जात नसल्याचा आरोप आमदारांनी केल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने त्यानंतरच्या पहिल्याच काम वाटपात पूर्णपणे नियमांचे पालन करण्याचा निर्णय घेतला. बांधकाम विभागाने काम वाटपासाठी दहा लाख रुपयांच्या आतील निधीची ३९ कामे फलकावर प्रदर्शित केली. जवळपास दीड वर्षांनी पहिल्यांदाच काम वाटपातील कामे फलकावर लागल्यामुळे ठेकेदारांनीही मोठा प्रतिसाद दिला. या ३९ कामांसाठी जवळपास २०० अर्ज आले. एका कामासाठी तर ३७ अर्ज आले होते. तसेच बहुतांश कामांसाठी प्रत्येकी दहापेक्षा अधिक अर्ज आले होते.

Nashik Z P
नाशिक महापालिकेत 706 पदांची भरती; डिसेंबरमध्ये प्रक्रिया

मागील आठवड्यात काम मागणी अर्ज देण्याची मुदत संपल्यानंतर आठवडाभरात काम वाटप समितीने गुरुवारी (दि.२४) या कामांचे वाटप करण्यासाठी बैठक बोलावली. मात्र, या बैठकीपूर्वीच नाशिकरोड-देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला पत्र देत काम वाटप समितीत प्रस्तावित केलेली कामे यादीतून वगळण्यात यावीत, अशा सूचना केल्या. आमदार सरोज अहिरे यांनी प्रस्तावित केलेली पाच कामे संबंधित ग्रामपंचायतींच्या माध्यमातून करायची असल्याचे त्यांनी ती यादीतून वगळण्याची सूचना केली होती. त्यानुसार बांधकाम विभागाने त्यांची वगळली. आमदार सरोज अहिरे यांच्याप्रमाणेच आमदार हिरामन खोसकर यांनीही बांधकाम विभागाला पत्र दिले. लोकांच्या मागणीनुसार या कामांमध्ये बदल करायचा असल्याने आधी सूचवलेली कामे रद्द करायची आहेत. त्यामुळे ती काम वाटप समितीच्या यादीतून वगळण्याची सूचना त्यांनी केली. त्यानुसार बांधकाम विभागाने त्यांची २२ कामेही वगळण्याचा निर्णय घेतला. यामुळे काम वाटप समितीकडे केवळ १२ कामे उरली. या उरलेल्या कामांसाठी प्रत्येकी एकपेक्षा अधिक अर्ज आले असल्याने काम वाटप समितीने या कामांसाठी ठेकेदारांची सोडत पद्धतीने निवड केली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com