नाशिक मनपाने 2 वर्षांत 'असे' वाचविले सव्वातीन कोटी रुपये

Nashik Municipal Corporation.
Nashik Municipal Corporation.Tendernama

नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेने (NMC) नाशिक शहरात लावलेले जवळपास एक लाख एलईडी दिवे (LED Light) व सर्व विभागीय कार्यालयांवर उभारलेले सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प यामुळे नाशिक महापालिकेची दोन वर्षांत सव्वा तीन कोटींची बचत झाली आहे.

Nashik Municipal Corporation.
मुंबई-बडोदा ई-वेचे काम 'टॉप गिअर'मध्ये सुरू; 901 हेक्टर भूसंपादन..

महापालिकेकडून टीपी लुमिनेअर प्रायव्हेट लिमिटेड (टाटा) कंपनीच्या माध्यमातून शहरात एलईडी दिवे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्वानुसार संबंधित कंपनीशी सात वर्षांचा करार करण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यंत  सहा विभागात एकूण 99 हजार 785 एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत. यात 2908 हायमास्ट दिव्यांचा समावेश आहे. डिसेंबर 2020 ते ऑक्टोबर 2022 या काळात दोन हजार 795 युनिटचा एलईडीसाठी वापर झाला. त्यापूर्वी शहरात सोडियम दिवे वापरले जात होते. सोडियम दिव्यासाठी दहा कोटी 84 लाख 70 हजार 247 युनिटचा वापर होत होता. एलईडी दिव्यांमुळे सहा कोटी 73 लाख 86 हजार ४९७ युनिटची बचत झाली. टाटा कंपनीकडून महापालिकेच्या देयकामध्ये पाच टक्के सवलत दिली जाते. यामुळे या काळात महापालिकेला कंपनीकडून दोन कोटी 44 लाख 15 हजार 321 रुपयांचा महसूल महापालिकेला प्राप्त झाला आहे.

Nashik Municipal Corporation.
नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण...

विभागीय इमारतींवर सौरऊर्जा

महापालिकेकडून मुख्यालयासह विभागीय कार्यालयाच्या इमारतीवर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. राजीव गांधीभवन, जिजामाता हॉस्पिटल, सिडको विभागीय कार्यालय, पंचवटी विभागीय कार्यालय, स्मार्टसिटी, फाळके स्मारक, महात्मा फुले कलादालन या इमारतींवर महापालिकेने सौरऊर्जा प्रकल्प उभारले आहेत. या प्रकल्पांतून महापालिकेला सप्टेंबर 2019 ते जून 2022 या कालावधीत एकूण 11,68,322 युनिट्सची निर्मिती झाली. त्याचा दर 4.59 रुपये आहे. महावितरणचा दर 11 रुपये प्रतियुनिट आहे. म्हणजेच प्रत्येक युनिटमागे 6.41 रुपयांची बचत होते. एकूण युनिटचा विचार करता 74 लाख 88 हजार 944 रुपयांची बचत झाली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com