नाशिकमधील लॉन्स रोडवर 'या' कारणामुळे उभारणार तीन उड्डाणपूल

Tilak Bridge Dadar Mumbai
Tilak Bridge Dadar MumbaiTendernama

नाशिक (Nashik) : शहरातील लॉन्सरोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संभाजी नगर (औरंगाबाद) महामार्गावरील हॉटेल मिरची चौकात झालेल्या अपघातानंतर या मार्गावरील सर्वच चौकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर कायमस्वरुपी उपाययोजना शोधण्याचे निर्देश दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या लॉन्सरोडवरील तीनही चौकांमध्ये तीन उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवला आहे. दरम्यान नाशिक महापालिकेच्या बांधकाम विभागानेही या उड्डाणपुलांबाबत पत्रव्यवहार केला आहे .यामुळष लवकरच मिरची चौक, सिद्धीविनायक लॉन्स चौक व नांदूर नाका येथील चौकात उड्डाणपूल उभारले जाणार आहेत.

Tilak Bridge Dadar Mumbai
EXCLUSIVE:नगरविकासच्या तब्बल अडीच हजार फाईल्स ३ महिने होत्या कुठे?

ऑक्टोबर महिन्यात औरंगाबाद महामार्गावरील मिरची हॉटेल चौकात एका खासगी ट्रॅव्हल बस व ट्रकच्या अपघातात बसला आग लागत बारा जणांचा मृत्यू झाला होता, तर ४८ प्रवासी गंभीर जखमी झाले होते. या घटनेची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्गावरील वाहतूक संदर्भात तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने उड्डाणपूल तयार करावे, अशी मागणी केली होती. त्यामुळे महानगरपालिका हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावर उड्डाणपूल किंवा अन्य उपाययोजना करण्याची जबाबदारी महापालिकेची किंवा तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला होता.

Tilak Bridge Dadar Mumbai
एसटीचा चेहरामोहरा बदलणार; ५ हजार ई-बस, २ हजार डिझेल बसेस लवकरच

राज्याचे सचिव तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीतही सार्वजनिक बांधकाम विभागाने हात वर करत निधीच्या कमतरतेचे कारण दिले होते. त्यानंतर महापालिकेने महामार्गावरील अपघाताची गंभीर बाब लक्षात घेता शासनाकडेदेखील उड्डाणपुलांसाठी पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाने हॉटेल मिरची चौक, सिद्धिविनायक लॉन्स चौक व नांदूर नाका चौक या तीन ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव मंत्रालयात सचिवांना सादर केला आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागानेही मागील दहा वर्षांमध्ये या मार्गावरील तीन चौकांमध्ये किती अपघात झाले, याची माहिती संकलीत करून ती राज्य सरकारकडे सादर केली जाणार आहे. यामुळे तेथे उड्डाणपूल उभारण्यासाठी सरकारकडून प्रतिसाद मिळण्यास मदत होईल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com