Good News! जानेवारीपासून नाशिक-बेळगाव विमानसेवा घेणार 'उडान'

Nashik Airport Ozar
Nashik Airport OzarTendernama

नाशिक (Nashik) : नाशिक ते बेळगाव (Nashik To Belgaum) विमानसेवा जानेवारी २०२३ पासून सुरू होणे अपेक्षित आहे. तसेच कोविडमुळे उडान योजनेचा कार्यकाळ पूर्ण न करू न शकलेल्या अलायन्स एअरला उडान योजनेअंतर्गत कालावधी वाढवून देणे विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांना पत्राद्वारे दिली आहे.

Nashik Airport Ozar
सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड मार्गाच्या मोजणीला पर्यावरणचा रेड सिग्नल?

उडान योजनेची मुदत संपल्यामुळे अलायन्स एअर या विमान कंपनीने नाशिकहून सुरू असलेली विमानसेवा बंद करण्याचे जाहीर केले होते. यामुळे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी विमान कंपन्यांना उडान अंतर्गत किमान २ वर्षे मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. याबाबत सिंधिया यांनी भुजबळ यांना पत्र पाठवून नाशिक विमानसेवा पूर्ववत करण्याबाबत माहिती दिली आहे.

Nashik Airport Ozar
मोठी भरती; नाशिक झेडपी फेब्रुवारीत भरणार 2 हजार जागा

भारत सरकारने टियर वन आणि टियर टू शहरांमधील हवाई संपर्क वाढवण्यासाठी उडान योजना सुरू केली आहे. रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम अंतर्गत विविध क्षेत्रांच्या बोलीमध्ये नाशिक एचएएल विमानतळाचाही समावेश करण्यात आला होता. त्यानुसार विविध विमान कंपन्यांकडून नाशिक विमानतळाला ९ शहरांशी जोडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. उडान योजना तीन वर्षांसाठी असून त्यानंतर विमान कंपन्यांनी व्यावसायिक पद्धतीने विमानसेवा चालवावी, असे या योजनेतून अपेक्षीत आहे. मात्र, बऱ्याचदा कंपन्या मुदतीनंतर सेवा बंद करण्याचे जाहीर करतात. यामुळे या योजनेचा हेतु साध्य होत नसल्याचे दिसत आहे.

Nashik Airport Ozar
निफाडला ड्रायपोर्टऐवजी होणार मल्टी मॉडल हब; ५०० कोटींचा डीपीआर

अहमदाबाद आणि पुण्यासाठी एअर अलायन्स, अहमदाबादसाठी ट्रूजेट आणि बेळगावसाठी स्टार एअरने या सेवा सुरू केल्या होत्या. मात्र, ट्रूजेटने ऑपरेशन बंद केले होते. तसेच स्टार एअर नाशिकमधून सेवा स्थगित करत आहेत. यामुळे उडान योजनेच्या उद्देशाला आणखी धक्का बसणार आहे. त्यामुळे या विमान कंपन्यांना उडान अंतर्गत किमान २ वर्षे मुदतवाढ द्यावी, अशी मागणी भुजबळांनी केली होती.

याबाबत सिंधिया यांनी भुजबळ यांना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, नाशिक विमानतळ अहमदाबाद, बंगळूरशी जोडणारे आरसीएस मार्ग बेळगाव, भोपाळ, गोवा, हिंडन, हैदराबाद आणि पुणे या निवडक शहरांना विमान सेवा चालवण्याची परवानगी दिली. आरसीएस-उडान अंतर्गत एअरलाइन ऑपरेटर मेसर्स घोडावत यांनी आरसीएस उड्डाणे सुरू केली. मात्र, नाशिक ते बेळगाव प्रवासी वाहतूक सेवा मागणी आणि कमी प्रवाशांमुळे बंद करण्यात आलेली आहे. ही सेवा सुरू पुन्हा करण्याचे निर्देश देण्यात आले असून जानेवारी २०२३ पासून नाशिक ते बेळगाव विमानसेवा पुन्हा सुरू होणे अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच आरसीएस मार्ग स्पाइसजेटद्वारे नाशिक ते हैदराबादला सेवा सुरू आहे.

Nashik Airport Ozar
हर हर गोदे, नमामि गोदे! नाशिकमध्ये गंगाआरतीसाठी 5 कोटींचा निधी

व्हीजीएफ शिवाय ३१ डिसेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या सर्व उडान मार्गांसाठी आरसीएस मार्ग किंवा नेटवर्कच्या सुरुवातीच्या तीन वर्षांच्या कालावधीचा अतिरिक्त एक वर्षाचा विस्तार, आधीच अनुकूल मानले गेले होते. मे. अलायन्स एअर ने ०१ फेब्रुवारी २०१९ रोजी नाशिक ते अहमदाबाद आणि हैदराबाद आणि २७ ऑक्टोबर २०१९ रोजी नाशिक ते पुणे आरसीएस उड्डाणे सुरू केली आणि त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. मात्र, कोविड-१९ साथीमुळे काही काळ सेवा बंद होती. त्यामुळे ही सेवा पुन्हा सुरू करण्याचे विचाराधीन असल्याची माहिती सिंधिया यांनी दिली आहे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com