नाशिकमधील 'या' रस्त्याचे ७१ कोटींतून होणार कॉंक्रिटीकरण

road
roadTendernama

नाशिक (Nashik) : नाशिक महापालिका (Nashik Municipal Corporation) हद्दीतील नाशिक-पेठ या साडेसहा किलोमीटर रस्त्यापैकी चार किलोमीटर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यास महापालिकेने मंजुरी दिली आहे. महापालिकेच्या मंजुरीनंतर या रस्त्याचे काम करण्यास स्मार्ट सिटी कंपनीने तयारी दर्शवली आहे. यामुळे या चार किलोमीटरच्या रस्त्याचे ७१ कोटींचे काम स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून होणार असून, त्यामुळे यामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची खड्ड्यांमधून कायमची मुक्तता होणार आहे.

road
शिंदे-फडणवीसांमुळेच रखडली मोदींची बुलेट ट्रेन; 'गोदरेज'चा घणाघात

नाशिक शहरातून पंचवटी ते तवलीफाटा या साडेसहा किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत महामार्ग व महापालिका यांच्यातील अधिकाराचा मुद्दा असल्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होऊन या साडेसहा किलोमीटर भागात बाराही महिने खड्डे असतात. यामुळे वाहनधारकांना कायम मनस्ताप सहन करावा लागतो. या रस्त्याची दुरवस्था कायमस्वरुपी दूर व्हावी, अशी अनेक वर्षांची मागणी आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ७१ कोटी रुपये लागरार असून महापालिकेची आर्थिक स्थिती खराब असल्यामुळे हा रस्ता स्मार्ट सिटी कंपनीच्या निधीतून व्हावा यासाठी आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी प्रयत्न केले. त्यावर स्मार्ट सिटी कंपनीने महापालिकेने तसा ठराव केल्यास काम करण्याची तयारी दर्शवली आहे. यानुसार महासभेने पेठ रोडवरील चार किमी रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्याचा ठराव मंजूर केला आहे. हा प्रस्ताव तांत्रिक तपासणीसाठी लेखाधिकाऱ्यांकडे पाठविला जाणार असून, त्यानंतर ठराव 'स्मार्ट सिटी'ला पाठवला जाणार आहे. 

road
'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून 25000 उद्योजक घडविणार'

नाशिक ते पेठ या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण झाले असून ते कॉंक्रिटीकरण नाशिक महापालिका हद्दीबाहेरून झाले आहे. महापालिकेच्या हद्दीत रस्त्याचे रुंदीकरणही झालेले नाही, तसेच या रस्त्यावर कायमच मोठमोठे खड्डे असतात. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यामध्ये मोठमोठे वृक्ष आलेले आहेत. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी व रुंदीकरणासाठी निधी नसल्याची महापालिकेची ओरड आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीत नागरी भागातील रस्त्यांसाठी अगदी तुटपुंजी तरतूद केलेली असते. यामुळे हा रस्ता स्मार्टसिटीच्या निधीतून करण्याचा प्रस्ताव आमदार राहुल ढिकले यांनी स्मार्ट सिटी कंपनीकडे मांडला होता. त्यांनी शिल्लक निधीतून रस्ता पूर्ण करण्याची तयारी दाखवली असून त्यासाठी महासभेने प्रस्ताव मंजूर केला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com