'या' कारणासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या मदतीला धावल्या १०० संस्था

Nashik Z P
Nashik Z PTendernama

नाशिक (Nashik) : जिल्हा परिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक शहर व जिल्ह्यातील जवळपास १०० संस्थांनी नाशिक जिल्हा परिषदेसोबत (Nashik Z P) येऊन ग्रामीण भागाच्या विकासासाठी योगदान देण्याची तयारी दर्शवली आहे. या १०० संस्थांमध्ये ७५ सामाजिक संस्था असून उर्वरित २५ औद्योगिक संस्था आहेत. या संस्थांच्या प्रतिनिधिींसोबत मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी बैठक घेऊन जिल्हा परिषदेची भूमिका विषद केली. यावेळी या शंभर संस्थांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या सोबतीने काम करण्याची तयारी दर्शवली.

Nashik Z P
एसटीच्या ताफ्यात ५,१५० ई-बसेस येणार; 'एडीबी' आर्थिक सहाय्य करणार

नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ग्रामीण भागाच्या विकासासाठी सामाजिक दायीत्व निधीचा उपयोग करण्याची संकल्पना मांडली. त्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे सामाजिक संस्थांना आवाहन केले. सामाजिक दायीत्व निधी देणाऱ्या संस्था व सामजिक दायीत्वचा उपयोग करून ग्रामीण भागातील नागरिकांच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्था यांचा समन्वय घडवून ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी जिल्हा परिषदेने केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे या सर्व संस्थांच्या प्रतिनिधींची मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी बैठक घेतली. यावेळी ७५ सामाजिक संस्था व २५ औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Nashik Z P
एका एकराला ८ कोटींचा भाव! चाकण बाह्यवळण मार्गामुळे...

जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय यंत्रणा कटिबद्ध आहे. जिल्ह्याचा विस्तार बघता नाशिक जिल्ह्यात अनेक सामाजिक संस्था या ग्रामीण भागात काम करण्यासाठी इच्छुक असतात, अशा संस्थांनी पुढील काळात जिल्हा परिषदेच्या सोबत काम करावे, उत्कृष्ठ काम करणाऱ्या संस्थांची नोंद घेण्यात येवून राष्ट्रीय सणांच्या वेळी अशा संस्थांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरव करण्यात येणार असल्याचे मित्तल यांनी सांगितले.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी जिल्हा परिषदेबद्दल माहिती देऊन या आधी जिल्हा परिषदेसोबत काम केलेल्या संस्था व त्यांच्या कामांबद्दल माहिती देत सामाजिक संस्थांना सर्वच विभागांमध्ये काम करण्यास वाव असल्याचे सांगितले.

Nashik Z P
रिलायन्सकडून गुड न्यूज! नाशिकच्या अक्राळे एमआयडीसीत मोठी गुंतवणूक

या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांनी आपल्या विभागांबद्दल माहिती देत सामाजिक संस्थांना आपल्या विभागाशी निगडीत कुठे काम करण्याची संधी आहे याबद्दल सांगितले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रवींद्र परदेशी, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी त्यांच्या विभागांमध्ये सामाजिक दायीत्व निधीतून काम करण्यास काय काय संधी आहेत, याची माहिती दिली. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com