उडान योजनेची मुदत संपताच नाशिकची हवाई उड्डाणेही बंद

Nashik Airport Ozar
Nashik Airport OzarTendernama

नाशिक (Nashik) : केंद्र सरकारची उडान योजना बंद झाल्यानंतर नाशिकची विमानसेवा विस्कळीत झाली असतानाच नाशिक विमानतळ 20 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या काळात हवाईपट्टीच्या वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. जवळपास 13  दिवस विमानसेवा बंद राहणार असल्याने नाशिकहून विमान सेवेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

Nashik Airport Ozar
नागपूर-पुणे ८ तासात सुपरफास्ट; असा आहे नितीन गडकरींचा मास्टरप्लॅन

नाशिक येथून विमानसेवा पुरवणाऱ्या दोन कंपन्यांनी विमानसेवा बंद केल्याने आता ओझर येथून केवळ दिल्ली व हैदराबाद या दोन शहरांसाठीच उड्डाणे सुरू आहेत. त्यातही नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये 13 दिवस धावपट्टी उपलब्ध राहणार नसल्याने नव्या वर्षापर्यंत तरी विमानसेवा सेवा विस्तारण्याची चिन्हे दिसत नाहीत. यामुळे पर्यटक व उद्योजकांची प्रचंड गैरसोय होणार आहे. 

एअर व स्पाइसजेट या विमान कंपन्यांची दिल्ली, अहमदाबाद, पुणे, बेळगाव व हैदराबाद या शहरांसाठी विमानसेवा सुरू होती. बेंगळूर व गोव्यासाठीही लवकरच सेवा सुरू केली जाणार होती. मात्र, केंद्र सरकारच्या उडान योजनेची मुदत संपल्याने अलायन्स एअर व स्टार एअर या दोन कंपन्यांनी सेवा बंद केल्या. स्टार एअरने आधीच सेवा बंद केली, तर अलायन्स एअरने ३१ ऑक्टोबर हा सेवेचा अखेरचा दिवस सांगून २६ रोजीच विमाने बंद केली. आता केवळ स्पाइसजेटची दिल्ली व हैदराबाद या सेवा सुरू आहेत. मागील आठवड्यात स्पाइसजेट या कंपनीच्या विमानाने प्रवाशांना दिल्ली विमानतळावर सोडले. मात्र, त्यांच्या बॅगा नाशिकमध्येच ठेवल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक प्रवाशांना विमानतळावरच रात्र काढावी लागली व दुसऱ्या दिवशी त्यांच्या वस्तू मिळाल्या. 

Nashik Airport Ozar
पुणेकरांसाठी गुड न्यूज; लवकरच निघणार रिंगरोडचे टेंडर

एकंदरीत ओझर येथून एचएएल च्या विमानतळावरून सुरू झालेली हवाई सेवा आता विस्कळीत झाली आहे. अनेक वर्षे नाशिकहून विमानसेवा सुरू होण्याचे स्वप्न उडान योजनेनंतर प्रत्यक्षात आले. आता या योजनेची मुदत संपली असल्याने विमान कंपन्यानी हात वर केले आहेत. याबाबत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी याबाबत विमान कंपन्यांशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले, तर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी याबाबत केंद्रीय उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्याशी या योजनेच्या मुदतवाढीबाबत चर्चा केली जाईल, असे म्हटले आहे.

दरम्यान, या प्रकरणी राजकीय हस्तक्षेपाची गरज आहे. नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील खासदार, आमदारांनी यासंदर्भात आवाज उठवायला हवा, अशी उद्योजकांची मागणी आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com