Nashik: MIDCमधील 'या' कंपन्यांकडे 45 कोटींची घरपट्टी थकित

Nashik Municipal Corporation.
Nashik Municipal Corporation.Tendernama

नाशिक (Nashik) : महापालिकेकडून सध्या घरपट्टी थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी बड्या थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजवून वसुली केली जात आहे. दरम्यान नाशिक महापालिका हद्दीतील सातपूर व अंबड एमआयडीसीमधील बंद पडलेल्या कंपन्यांकडे सुमारे ४५ कोटींची थकबाकी आहे. याठिकाणी ढोल वाजवून काहीही उपयोग होणार नसल्याने महापालिकेने यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. 

Nashik Municipal Corporation.
विदर्भातील 'या' आदिवासी बहूल जिल्ह्यात धावणार नियो मेट्रो

मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेने थकबाकीदारांच्या दारासमोर ढोल वाजवून वसुली करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी टेंडर काढून ढोल पथकांची निवड केली आहे. या मोहिमेत बड्या थकबाकीदारांच्या हॉटेल, इमारती, संकुलांच्या समोर ढोल वाजवून सुमारे ४ कोटींची वसुली करण्यात आली आहे, तर एमआयडीसीतील अवसायनात गेलेल्या कंपन्यांकडून ४५ कोटींची थकबाकी वसुलीसाठी त्यांच्या बंद दरवाजांसमोर ढोल वाजवून काहीही उपयोग होणार नाही. बंद पडलेल्या कंपन्यांना टाळे ठोकण्यात आलेले आहे. त्यांच्याकडून वसुली होणे शक्य नसल्याने महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. त्यात महापालिकेची मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी या मालमत्ता धारकांची मालमत्तांचा लिलाव करून प्राप्त झालेली रक्कम महापालिकेकडे वर्ग करावी, अशी मागणी पत्रात केली आहे. या पत्राबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात, यावर या वसुलीचे भविष्य अवलंबून आहे. एकीकडे उद्योजक तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे मालमत्ता कर थकवत असून महापालिका इतर मालमत्ता धारकांकडून वसुलीसाठी ढोल वाजवत असल्याचे चित्र तयार झाले आहे.

Nashik Municipal Corporation.
फडणवीसांच्या घोषणेने 'त्या' शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला!

महापालिकेची घरपट्टी थकबाकी साडेतीनशे कोटींच्या घरात असून १२५८ थकबाकीदारांना नोटीस देऊनही मालमत्ता कर भरणा केला नसल्याने थकबाकीदारांच्या दारासमोर ढोल वाजवला जात आहे.

Nashik Municipal Corporation.
सध्या तरी गुंठेवारीतील बांधकामांची दस्त नोंदणी नाही; कारण...

महापालिकेच्या मालमत्ता कर वसुली विभागाने सात दिवसांपासून ४३८ मिळकत धारकांच्या घरासमोर ढोल वाजवल्यानंतर ४ कोटी १ लाख १८ हजार रुपये महसूल वसूल केला आहे.  मोहिमेच्या पाचव्या दिवशी एकूण ४ कोटी १ लाख १८ हजार रुपये कर जमा झाला. पहिल्या दिवशी ७३ लाख, दुसऱ्या १ कोटी ९ लाख, तिसऱ्या दिवशी ९१ लाख, चौथ्या दिवशी ५७ लाख तर पाचव्या दिवशी ६९ लाख वसूल झाले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com