देशाच्या 'वाईन कॅपिटल'ला गोवा, बंगळूर एअर कनेक्टिव्हिटी मिळेना?

SpiceJet
SpiceJetTendernama

नाशिक (Nashik) : देशातील महत्त्वाच्या शहरांना जोडणारी विमान सेवा ही केवळ प्रवाशांच्या सोयीसाठीच नाही तर गुंतवणुकीसाठी देखील पोषक ठरणार आहे. नवीन उद्योगांच्या गुंतवणुकीसाठी येणारे उद्योगपती पायाभूत सुविधा, दळणवळणाची साधने बघत असल्याने ही सेवा आवश्यक आहे. असे असतानाही नाशिक-गोवा आणि नाशिक-बंगळूर विमान सेवेला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्याचा फटका नाशिक आणि परिसरातील विकासाला बसणार आहे. (Will 'Wine Capital' get air connectivity to Goa, Bangalore)

SpiceJet
चांदणी चौक : अभूतपूर्व वाहतूक कोंडीने वाहनचालकांना फूटला घाम

नाशिकहून गोवा आणि बंगळूरच्या विमान सेवेला सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस प्रारंभ होणार होता. मात्र, डीजीसीएकडून स्पाईस जेटच्या विमान संख्येवर मर्यादा घातल्यामुळे हा मुहूर्त हुकल्याची चर्चा आहे. दरम्यान कंपनीने ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात यश आल्यास दिवाळीपूर्वीच नाशिक-गोवा व नाशिक-बंगळूर विमान सेवा सुरू होऊ शकेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

SpiceJet
अखेर शिंदे सरकारने राज्यातील कामांवरील उठवली स्थगिती

नाशिकमधून सध्या स्पाईस जेटची दिल्ली विमान सेवा सुरू असून आठवड्यातील सातही दिवस ही सेवा चालवली जाते. याशिवाय नाशिकमधून पुणे, बेळगाव, अहमदाबादसाठी देखील वेगवेगळ्या कंपन्यांची विमान सेवा सुरू आहे. केंद्र शासनाच्या उडान योजने अंतर्गत अनुदानित दरात प्रवासी तिकिटे मिळत असल्याने प्रवासी व कंपन्या दोघेही फायद्यात आहेत. 

SpiceJet
सिन्नर माळेगाव एमआयडीसीत 40 एकर जमीन घोटाळा; कोणी केली तक्रार?

स्पाईस जेटची नाशिक- दिल्ली विमान सेवा कोरोना काळात बंद पडली होती. ती सेवा आता सुरू झाली असून नाशिककरांचा या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. केंद्र शासनाच्या उडान योजनेंतर्गत स्पाईस जेटने गोवा आणि बंगळुरूसाठीही प्रस्ताव दिला होता. मात्र, अद्याप या सेवा सुरू झालेल्या नसल्याने कंपनीकडून वारंवार नवीन तारखा दिल्या जात आहेत. कंपनीने दिल्लीसाठी सेवा सुरू करताना नाशिक ते गोवा आणि नाशिक ते बंगळुरू ही विमान सेवा २५ सप्टेंबर रोजी घोषित करण्याची घोषणा केली होती. मात्र, सप्टेंबर संपला तरी या सेवेचे पुढे काहीच झालेले नाही. कंपनीला काही कारणांमुळे डीजीसीएने विमान संख्येवर मर्यादा घातल्या आहेत. त्यामुळे ही सेवा रखडली आहे. नवीन विमाने उपलब्ध झाल्यावर ही सेवा सुरू होईल असे सांगण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com