नाशिकसाठी साठ किलोमीटरचा बाह्य रिंगरोड; कुंभमेळा आराखड्यात...

Ring Road
Ring RoadTendernama

नाशिक (Nashik) : मागील सिंहस्थात नव्वद किलोमीटरचा अंतर्गत रिंगरोड विकसित केल्यानंतर आगामी सिंहस्थात साठ किलोमीटर बाह्य रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, रिंगरोडचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या आहेत. 

Ring Road
'या' वादग्रस्त कंपनीवर शिंदे-फडणवीस मेहरबान का? २० कोटींच्या...

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे 2027-2028 या वर्षात सिंहस्थ कुंभमेळा होणार असून कुंभमेळ्याचे नियोजन करण्यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी समिती गठित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सिंहस्थ विकास आराखडा बैठकीत आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत. सिंहस्थात भूसंपादनासह साठ किलोमीटरच्या बाह्य रिंगरोड प्रस्ताव प्राधान्याने तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बांधकाम विभागाने पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करावा. मिळकत विभागाने आवश्यक भूसंपादन, वैद्यकीय व आरोग्य विभागाने सेवा करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या. 

Ring Road
तुकडेबंदीचा निर्णय शिंदे सरकार उठविणार? खंडपीठाच्या निर्णयाने...

रिंग रोडमुळे गर्दीचे नियोजन

मागील सिंहस्थात नाशिक शहरात अंतर्गत रिंग रोड विकसित झाला आहे. त्यामुळे नाशिक शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात कमी वेळेत जाण्यासाठी याचा उपयोग केला जात आहे. यामुळे नागरिकांना रिंगरोडचे महत्व समजले आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन नाशिक शहराच्या बाहेरून येणाऱ्या वाहनांना शहराच्या पलीकडे जाण्यासाठी बाह्य रिंगरोडचे नियोजन करण्यावर या बैठकीत चर्चा झाली. मागील काळात हा बाह्य रिंगरोड विकसित झाला असून काही ठिकाणी भूसंपादना अभावी ते काम रखडले आहे. यामुळे येत्या सिंहस्थ2 आराखड्यात या बाह्य रिंगरोडचा समावेश करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. हा बाह्य रिंगरोड साधारण 60 किमी लांबीचा होणार असून त्याची रुंदी 30 ऐवजी 60 मीटर करण्याचे निश्चित करण्यात आले. या रिंगरोडमुळे बाहेरून येणारी वाहने शहरात येऊन गर्दी करण्यापेक्षा बाहेरच्या मार्गाने जाऊ शकणार आहेत. त्यामुळे भविष्यात शहरातील वाहतूक कोंडी टाळता येऊ शकणार आहे.

प्रस्तावित बाह्य रिंग रोड

• नांदूर नाका ते जत्रा हॉटेल लिंक रोड

• सातपूर-अंबड लिंक रोड

• गंगापूर- सातपूर लिंक रोड

• बिटको विहीतगाव-देवळाली रोड

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com