येवल्याने अशी अनुभवली ठेकेदारांमधील माणुसकी...

Helping Hand
Helping HandTendernama

नाशिक (Nashik) : येवला तालुक्यातील जळगाव नेऊर येथील ठेकेदाराचा नुकताच फुप्फुसाच्या कर्करोगाने मृत्यू झाला. सुस्वभावी मित्र अचानक सर्वांना सोडून गेला. त्याचे कुटुंब उघड्यावर आले. याची मनाला सल लागल्याने ठेकेदार मित्रांनी सहा लाखावर रुपये जमा करून त्याच्या कुटुंबियांना मदत करून आधार दिला आहे.

Helping Hand
फडणवीस वित्तमंत्री तरीही नागपूर मनपाचा 500 कोटींचा निधी का अडकला?

देवेंद्र (बंडू) शिंदे या ठेकेदाराचा मागील आठवड्यात आजारपणाने मृत्यू झाला. त्याच्या पश्चात कुटुंबाला हातभार लागावा यासाठी सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषदेतील ठेकेदारानी एकत्रित येत शिंदे यांच्या दशक्रिया विधीच्या दिवशी मंगळवारी (दि. १३) जमा केलेला ६ लाख ५७ हजार ७०० रुपयांचा धनादेश शिंदे कुटुंबीयांकडे सुपूर्द केला. तालुक्यातील जळगाव नेऊर येथील ठेकेदार देवेंद्र शिंदे यांना जानेवारी २०२१ मध्ये फुप्फुसाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले. घरातील आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही कुटुंबाने उपचारासाठी केला. यात लाखो रुपये खर्ची झाले. मात्र, शिंदे यांचे प्राण वाचू शकले नाहीत. ४ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंबावर मोठा आघात झाला. आपला एक सहकारी ठेकेदार गेल्याचे शल्य ठेकेदारांना होते. यासाठी ठेकेदारांनी एकत्र येत त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देण्याचा  निर्णय घेतला. केली. 

Helping Hand
शिंदे-फडणवीसांचे मोदींना 'रिटर्न गिफ्ट'; महाराष्ट्राला मोठा झटका

सोशल मीडियाच्या माध्यमातून ठेकेदारांनी एकमेकास आवाहन केले, अवघ्या दहा दिवसांत सहा लाख ५७ हजार रुपयांचा निधी जमा झाला. तब्बल १६० ठेकेदारांनी आपापल्या परीने मदतीचा हात मित्राला दिला. जमा झालेल्या निधीचा धनादेश मंगळवारी त्यांच्या कुटुंबियांकडे देण्यात आला.

Helping Hand
शिंदे-फडणवीसांना गुजरातने चुना लावला; 'हा' मोठा प्रकल्पही पळवला

याकामी प्रामुख्याने मकरंद सोनवणे, प्रकाश बनकर, हरपलसिंग भल्ला, नितीन गायकवाड, पी. के. काळे, सुनील कांदे, विजय घुगे, शिवाजी घुगे, संदीप दरगोडे, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, अनिल दारूंटे, सुनील पैठणकर, अविनाश गाडे, भाऊसाहेब धनगर, अनिल आव्हाड, नितीन आहेर, विठ्ठलराव आठशेरे, राहुल परदेशी, शशी आव्हाड, आर. टी. शिंदे, किशोर खोड, भाऊसाहेब सांगळे, संजय आव्हाड, चंद्रशेखर डांगे, रामनाथ कुटे, राजाराम कुऱ्हाडे, वसंत पवार, मुन्ना पाटील, एल. टी. पवार, दत्ता थोरात, प्रमोद बोडके, योगेश गंडाळ, रवी जगताप, मनोहर जावळे, दिनेश आव्हाड आदी जिल्हाभरातून १५८ बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींनी मदत केली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com