नाशिककरांना दोन वेळा पाण्यासाठी हवेत 300 कोटी; अमृत योजनेत...

Water
WaterTendernama

नाशिक (Nashik) : नाशिक शहरातील भविष्यातील वाढत्या लोकसंख्येला दोन वेळा पाणीपुरवठा करता यावा, यासाठी नाशिक महापालिकेने जलवाहिन्यांचे नवीन जाळे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून 300 कोटींचा निधी मिळवण्यासाठी नाशिक महापालिकेने प्रस्ताव पाठवला आहे.

Water
गुड न्यूज! मुंबई-पुणे अंतर आणखी कमी होणार; या बोगद्याचे 80 टक्के..

नाशिक शहरातील लोकसंख्या 20 लाख असून 2041 पर्यंतची वाढती लोकसंख्या व तो पर्यंत शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन शहरातील सर्व रहिवाशांना दोन वेळा पाणी पुरवठा करता यावा याचे नियोजन नाशिक महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे. शहराच्या विकास आराखड्यानुसार नवीन वसाहती कोणत्या भागात उभारल्या जाऊ शकतात, याचा अंदाज घेतला जात आहे. भविष्यातील वाढत्या वसाहतींचा विचार करता, सध्याच्या पाणी पुरवठा जलवाहिन्या अपुऱ्या पडणार आहेत. यामुळे सध्याच्या जलवाहिन्यांची क्षमता वाढवणे, नवीन जलवाहिन्या टाकणे यासाठीचा आराखडा तयार केला असून त्याच्या अंमलबजावणीसाठी 300 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Water
नाशिक मनपाची हायड्रॉलिक शिडी खरेदी वादात;'ती' कागदपत्रे संशयास्पद?

नाशिक महापालिकेची आर्थिक स्थिती बेताची असून या जलवाहिन्या बदलणे व नवीन जलवाहिन्या टाकण्याचा खर्च महापालिकेला झेपणार नाही. यामुळे नाशिक महापालिकेने 226 कोटींचा प्रस्ताव तयार करून या योजनेचा अमृत योजनेत समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकारला पाठवला होता. मात्र, तो प्रस्ताव त्यावेळी मंजूर होऊ शकला नाही. त्यानंतर महापालिकेने पुन्हा सुधारित प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावात विस्तारित नाशिक शहरातील सर्व भागांमध्ये पुरेशा क्षमतेच्या जलवाहिन्यांचे जाळे टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा सुधारित प्रस्ताव 300 कोटींचा असून तो मंजूर झाल्यास नाशिक शहरातील नागरिकांना भविष्यात दोन वेळा पाणी पुरवठा करता येणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com