Nashik: प्रशासकांचा रामशास्त्री बाणा; ठेकेदारांची का उडाली झोप?

Nashik ZP
Nashik ZPTendernama

नाशिक (Nashik) : Nashik Municipal Corporation महासभेने मंजुरी दिलेला व बांधकाम विभागाकडे वर्ग केलेला 7 कोटींचा सेस निधी प्रशासक करकीर्दीतही पाच महिन्यांपासून लटकला आहे. संबंधित विभागांनी सर्व औपचारिकता पूर्ण करूनही, प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड कधी निर्णय घेतात, याची माजी सदस्य व ठेकेदार यांना प्रतिक्षा आहे. दरम्यान प्रशासकानी मागील तारीख टाकून सही करणार नसल्याचे स्पष्ट केल्याने या निधीचे व सदस्यांनी सुचवलेल्या कामांचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Nashik ZP
चौपदरीकरणानंतरही पुणे-नाशिक प्रवासाला का लागताहेत ६ तास?

मागील वर्षी जिल्हा परिषद सदस्यांच्या कारकिर्दीचे अखेरचे वर्ष असल्यामुळे सर्व सदस्यांनी नोव्हेंबर 2021 पासून तत्कालीन सदस्यांनी जिल्हा परिषदेकडे किती सेस जमा झाला याचा पाठपुरावा सुरू केला. मात्र तत्कालीन अध्यक्षांनी सदस्यांची मुदत संपण्याच्या अखेरच्या टप्प्यात सदस्यांकडून पत्र मागवून त्यांना निधी दिला. मात्र, निधी वितरणाबाबत सर्व साधारण सभेने केलेल्या ठरावाचे पालन न केल्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अध्यक्षांनी मान्यता दिलेली सर्व कामे रद्द केली. त्यानंतर माजी सदस्यांकडून पुन्हा कामाच्या याद्या मागवून प्रत्येक सदस्याला 7.72 लाख रुपये निधी दिला. त्याचे नियोजन झाल्यानंतर काही निधी शिल्लक राहिल्याचे बघून पुन्हा प्रत्येक सदस्याला प्रत्येकी दोन लाख रुपये निधी देण्याचा निर्णय झाला.

Nashik ZP
विदर्भातील 'या' 149 गावांत 120 ड्रोन का घेतायेत भराऱ्या?

पुन्हा मुदत संपलेल्या जि. प. सदस्यांकडून प्रत्येकी दोन लाखांच्या कामांची पत्रे मागवण्यात आली. या सगळ्या गडबडीत जुलै उजाडला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्यता दिल्या नंतर जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेचे अधिकार प्राप्त झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक लीना बनसोड यांच्याकडे मान्यतेसाठी फाईल गेली. या सेस निधीतील कामांना मार्च अखेरपर्यंत मान्यता दिली आहे, असे कागदोपत्री दाखवायचे आहे. मात्र प्रशासकांनी त्या फाईलवर बॅक डेटेड सही करणार नाही, अशी भूमिका घेतल्याची सांगितले जात आहे. यामुळे महिन्यापासून सेस निधीच्या मान्यतेची फाईल, निर्णयाविना पडून आहे.

Nashik ZP
सारोळा घाट रस्त्याला वन विभागाची आडकाठी; पर्यटकांचा मार्ग धोकादायक

मान्यतेआधीच कामे पूर्ण?

कोणत्याही योजनेत होऊ न शकणारे पण नागरिकांसाठी महत्त्वाचे काम असल्यास जिल्हा परिषद सदस्य ते सेस निधीतून मंजूर करून देतात. सेस निधी सदस्यांना हमखास मिळणार असल्याने ठेकेदारही कार्यारंभ आदेश नसताना कामे करतात, असा जिल्हा परिषदेत प्रघात आहे. त्यानुसार सदस्यांनी पत्रात नमूद केलेली अनेक कामे आधीच पूर्ण झाली असण्याची शक्यता आहे. मात्र, आता या निधीच्या मंजुरीला ब्रेक लागल्यामुळे त्या कामांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Nashik ZP
5 कोटी पडून; मग नाशिक ZPच्या नव्या इमारतीचे घोडे अडले कुठे?

आताच रामशास्त्री बाणा का?

प्रशासक लीना बनसोड यांनी यापूर्वी 15 व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपात झालेल्या चुका दुरुस्तीसाठी मागील तारखेने काम करण्यास मान्यता दिली होती, तर सेससाठी तसा निर्णय घेण्यास काय हरकत आहे, असे माजी सदस्य व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com