82 हजार कोटी अन् 426 KMचा बोगदा विदर्भाचे भाग्य उजळवणार का?

वैनगंगा ते नळगंगा नदी जोड प्रकल्प वेळेत पूर्ण करणार!
Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama

नागपूर (Nagpur) : विदर्भातील (Vidarbha) वैनगंगा ते नळगंगा महत्त्वाचा नदी जोड प्रकल्प (Wainganga - Nalganga River Linking Project) असून, याबाबतचे जवळपास सर्व आराखडे तयार करण्यात आले आहेत. यासाठी 426 किमीचा बोगदा (Tunnel) तयार करण्यात येत असून, राज्यातील हा सर्वात मोठा हा बोगदा असेल. या प्रकल्पासाठी निधी उभारण्याबाबत योजना तयार करण्यात येत आहे. विदर्भाचे भाग्य बदलणारा हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत निश्चित वेळेत पूर्ण करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत दिली.

Devendra Fadnavis
नाशिक मनपातील 'या' 2 विभागांत तब्बल 706 जागांची मोठी भरती

विदर्भातील वैनगंगा ते नळगंगा या एकमेव नदी जोड प्रकल्पाचा नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सीकडून प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असल्याबाबत लक्षवेधी सूचना श्वेता महाले यांनी उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या प्रकल्पाबाबत राज्यस्तरीय समितीची मान्यता घेऊन टेंडर काढण्यात येईल. हा प्रकल्प संपूर्ण विदर्भासाठी नवसंजीवनी देणारा ठरेल.

Devendra Fadnavis
सातपूर आयटीआयमध्ये पुढील वर्षी सुरु होणार 'हे' नवे ३५ अभ्यासक्रम

यासाठी पाच लाख 72 हजार हेक्टर जमीन संपादित केली आहे. यासाठी सुधारित आराखडा तयार केला असून, त्यासाठी महाराष्ट्र शासन 82 हजार कोटी खर्च करेल. या प्रकल्पामुळे विदर्भातील दुष्काळी भागातील प्रश्न सुटणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रकल्पात वाशीम जिल्ह्याचा समावेश केला आहे. हा प्रकल्प पुढे परभणी, हिंगोली पर्यंत नेण्यासाठी रचना करण्यात आली आहे. हे पाणी ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून नेऊन दुष्काळी भागासाठी वरदान ठरणार आहे.

Devendra Fadnavis
'नमामि गोदा'चा आराखडा होणार तयार १७ कोटींमध्ये; 'या' कंपनीची निवड

या आराखड्यात बुलढाणा जिल्ह्याचा समावेश आहे. या  जिल्ह्यावर कुठलाही अन्याय होणार नाही. बुलढाण्यातून वाशिमला पाणी जाऊ शकेल या दृष्टीने प्रयत्न केले जातील. यासाठी सर्व जागा अधिग्रहित करून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सदस्य हरीश पिंपळे, दादाराव केचे, राजेंद्र शिंगणे यांनी या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सहभाग घेतला होता.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com