मुंबईत २२०० कोटींच्या रस्त्यांच्या कामावर 'व्हिजिलन्स'ची करडी नजर

BMC
BMCTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबई शहरात २३६ किलोमीटर कॉंक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यासाठी २ हजार २०० कोटी रूपयांचा खर्च होणार आहे. या कामांची गुणवत्ता तपासणी आता मुंबई महापालिकेच्या 'व्हिजिलन्स' विभागाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होईल असा महापालिकेला विश्वास आहे.

BMC
'या' एका रस्त्याने शिवसैनिकांना थकवले; आता घेतोय मनसेची परीक्षा

मुंबई महापालिकेचे रस्ते हे वादग्रस्त गुणवत्तेमुळे नेहमीच चर्चेत असतात. मुंबईतील रस्त्यांच्या खड्ड्यामुळे अनेकदा महापालिकेला सडकून टीकाही सहन करावी लागते. त्यामुळेच पालिकेच्या रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर यापुढच्या काळात वॉच राहणार आहे. त्यामुळे मुंबईतील रस्त्यांच्या गुणवत्तेवर मुंबई महापालिकेच्या दक्षता विभागाची करडी नजर असणार आहे. मुंबईतील १८० रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता पालिकेकडून तपासण्यात येणार आहे.

BMC
भुजबळांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शिंदे सरकारकडून मोठा निधी

मुंबई शहरात ४० रस्त्यांची कामे सुरू आहेत. तर पश्चिम उपनगरात ७१ आणि पूर्व उपनगरात ७० रस्त्यांची कामे सुरू आहेत. या रस्त्यांची निवड ही पालिकेच्या सॅप प्रणालीतून करण्यात आली आहे. त्यानुसार या कामांवर पालिकेची नजर असणार आहे. मुंबईत २३६ किलोमीटरच्या कॉंक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यासाठी २ हजार २०० कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. या कामांची गुणवत्ता तपासणी ही पालिकेच्या दक्षता विभागाकडून करण्यात येईल. या रस्त्यांचे आतापर्यंत २५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

BMC
मुंबई : महत्त्वाच्या 'या' ब्रीजचे काम बीएमसी २ वर्षात करणार पूर्ण

या रस्त्यांची निवड ही सॅप प्रणालीने होत असते. कोणत्याही रस्त्याची निवड या प्रणालीतून होते. एरव्ही होणारा मानवी हस्तक्षेप टाळत एक स्वतंत्र तपासणी करण्यासाठी दक्षता विभाग काम करतो. महापालिकेच्या यंत्रणेतूनच ही कामांची निवड होते. त्यामुळे या गुणवत्ता तपासणीत दोषी आढळणाऱ्या कंत्राटदाराला दर्जाच्या आणि गुणवत्तेच्या निकषाच्या आधारे दंडाची रक्कम आकारण्यात येते. त्यामध्ये डिफेक्ट किंवा कर्तव्यातील कसूर याप्रमाणेच ही दंडाची आकारण होत असते अशी माहिती पालिकेचे दक्षता विभागाचे सहआयुक्त अजित कुंभार यांनी दिली. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com