मोठ्या प्रकल्पांच्या रियल टाईम मॉनिटरींगसाठी शिंदेंचा मोठा निर्णय

Eknath Shinde
Eknath ShindeTendernama

मुंबई (Mumbai) : विविध शासकीय योजना किंवा मोठ्या विकास प्रकल्पांची प्रगती कशी सुरु आहे, याचे रियल टाईम मॉनिटरींग करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. गुजरातच्या धर्तीवर 'सीएम डॅशबोर्ड' ही संकल्पना राज्यातही राबविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आपले खास दूत नुकतेच गुजरातच्या दौर्यावर पाठवले होते. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार गुजरातच्या सीएम डॅशबोर्ड मॉडेलचा अभ्यास करत आहेत.

Eknath Shinde
अखेर शिंदे सरकारने राज्यातील कामांवरील उठवली स्थगिती

डाटा कलेक्शन, डाटा व्हॅलिडेशन, डाटा अॅनलिसिस, आयडेंटिफिकेशन ऑफ करेक्टिव्ह इंडिकेटर्स, परफॉर्मन्स मेजरमेंट, फीडबॅक मॅनेजमेंट, सिटीझन रिस्पॉन्स आणि करेक्टिव्ह मेकॅनिझम याद्वारे सीएम डॅशबोर्ड काम करतो. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कार्यकाळात २०१८ मध्ये सीएम डॅशबोर्डची सुरुवात झाली. नॅशनल इंफॉर्मेटिक्स सेंटरच्या मदतीने हे साकारण्यात आले. ई गव्हर्नन्ससंबंधी सर्व डाटा एकाच कमांडवर स्क्रीनवर सीएम डॅशबोर्डवर दिसतो. यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाला विविध विभाग, सेवा आणि अधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करणे सोपे जाते. त्यांच्या समस्या सोडवणेही सोपे जाते. सीएम डॅशबोर्ड सिस्टिमद्वारे राज्यात झोननिहाय समीक्षण करता येते.

Eknath Shinde
सरकारचा 'फोकस' पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर; 'या' योजनेला मंजुरी

जिल्हा आणि तहसील पातळ्यांवरही परफॉर्मन्स पाहता येतो. सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवर रँकिंग देता येते. त्यानुसार जिल्ह्यांचे या मॉडेलवर रँकिंग ठरते. त्यामुळे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला सीएम डॅशबोर्डवर आपले प्रदर्शन उत्कृष्टच असावे, ही जबाबदारी येते. सीएम डॅशबोर्डला राज्य सरकारमधील सर्व विभागांशी जोडले जाते. यात कलेक्टर, डीडीओ आणि एसपीदेखील असतात. एखाद्या जिल्ह्यातील एखाद्या योजनेवर कशी अंमलबजावणी सुरु आहे, हे मुख्यमंत्र्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये बसूनच कळते. उदा. गांधीनगर जिल्ह्यात आतापर्यंत किती मंजूर निधी खर्च झाला. जमिनीसंबंधी किती टक्के दस्तावेजांचे डिजिटायझझालेझालं. एवढेच नाही तर एखाद्या अधिकाऱ्याने टास्क दिल्यानंतर किती पोलीस स्टेशनचे निरीक्षण केले, हेही यातून कळते. ई गव्हर्नन्सशी संबंधित 3,000 इंडिकेटर्सवरील परफॉर्मन्स या मॉडेलद्वारे कळतो. फास्ट डिलिव्हरी आणि समस्यांचे तत्काळ निदान करणे गुजरात सरकारला सोपे झाले. सर्वात मोठा फायदा म्हणजे योजना किंवा विकास प्रकल्प कुठवर आलाय, याचे रियल टाईम मॉनिटरींग शक्य होते. कोरोना काळात तर बेड, ऑक्सिजन, औषधांचा साठा ही सर्व माहिती डॅशबोर्डवर व्हिडिओ कॉलद्वारे दिसत होती. या सीएम डॅशबोर्ड प्रणालीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com