मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी 'पॅचवर्क'चा फंडा पण धो-धो पावसाने..

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : आडगाव-निपानी ते झाल्टा फाटा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२११ जुना बीडबायपास या दोन किमी खड्डेमय रस्त्याने आजवर अनेकांचे बळी घेतले. अनेकांना कायमचे अंथरूणावर लोळत पडण्याची वेळ आली. या खड्डेमय रस्त्यावर टेंडरनामाने वृत्त मालिका प्रसिद्ध केली. तेव्हा पीडब्लुडी अंतर्गत जागतिक बँक प्रकल्पाच्या एका अभियंत्याने सदर रस्ता नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडियाकडून (NHAI) जरी रस्ता आमच्याकडे हस्तांतरीत झाला असला, तरी अद्याप सरकारची मंजुरी नसल्याने रस्ता दुरूस्ती होऊ शकत नसल्याचे म्हणत कानाडोळा केला होता. मात्र, याच अभियंत्याच्या देखरेखीखाली मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी आदल्यादिवशीच खड्डेमय रस्त्यावर डांबराचे पॅचवर्क सुरू करण्यात आले. मात्र, नियतीला देखील या विभागाचा हा फसवा फंडा मान्य नव्हता की काय, पॅचवर्कचे काम सुरू होताच मुसळधार पावसाने धो-धो धुतले आणि अधिकाऱ्यांचा डाव उधळला. याबाबत पीडब्लुडीचे जागतिक बँक प्रकल्पाचे उप अभियंता शरद सुर्यवंशी यांना याकामाबाबत विचारले असता विभागामार्फतच काम सुरू आहे. काम झाल्यावरच खर्चाचा ताळमेळ लावता येईल. मुख्यमंत्र्यांचा पैठण दौरा असल्याने तातडीने काम काढले, पण पाऊस मुसळधार असल्याचे ते म्हणाले.

Aurangabad
राज्याचा मेकओव्हर करणाऱ्या 'या' ३६ प्रकल्पांवर थेट सीएमओचे लक्ष

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) १२ सप्टेंबरला औरंगाबाद दौऱ्यावर येत असून, पैठण येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र त्यांच्या दौऱ्यापूर्वी आधी नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडियाने (NHAI) कांचनवाडी ते पैठण मार्गाची विनाटेंडर तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेतले. विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच रस्त्याच्या दुरूस्तीसाठी एनएचएआयने साडेसहा कोटी रूपये खर्च केले होते. औरंगाबादच्या जी. एन. आय. इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदाराकडून काम केले होते. डांबरी रस्त्याचा दोष निवारण कालावधी तीन वर्षाचा असताना एनएचएआयने त्याच कंत्राटदाराकडून पुन्हा पाच कोटीची तुंबडी भरत मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी काढलेल्या दुरूस्तीवर 'टेंडरनामा'ने प्रहार करताच औरंगाबादेत मोठी खळबळ उडाली होती.

Aurangabad
मुख्यमंत्र्यांच्या शहरातील रुग्णालयाचे ५२७ कोटींचे टेंडर कुणाला?

जागतिक बँक प्रकल्पाचा पराक्रम

मुख्यमंत्री यांच्या पैठणमध्ये होणाऱ्या सभेसाठी ते चिकलठाणा विमानतळाकडून कॅम्ब्रिज ते झाल्टाफाटा-आडगाव निपानी-नव्या बीडबायपासवरून पैठणला जाणार असे कळताच पीडब्लुडीच्या जागतिक बँक प्रकल्प शाखेतील अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. रविवार सुटीचा दिवस असताना झाल्टा ते आडगाव फाटा रस्त्याच्या पॅचवर्कचे काम हाती घेतले. मात्र काम सुरू होताच त्यावर मुसळधार पावसाने धो-धो धुतले. त्यामुळे आम्ही गेल्या दहा वर्षापासून रस्ता दुरूस्तीची मागणी करत होतो. तेव्हा एक विभाग दुसऱ्या विभागाकडे बोट दाखवत आमची बोळवण करत होता. मात्र आता मुख्यमंत्र्यांचा दौरा जाणार असल्याचे कळताच भर पावसात काम काढुन कोट्यावधीचे नुकसान करत सरकारच्या तिजोरीवर घाव घालत जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत असल्याची जोरदार चर्चा आडगाव-निपानी-झाल्टा फाट्यावर सुरू होती.

Aurangabad
औरंगाबाद मनपात प्रशासकांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी कोण?

शिंदे आता तुमच्यातला 'नायक' जागा होणार काय ?

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगर-कल्याण मार्गावरील खड्डे पाहून प्रचंड संतापले होते. दरम्यान पीडब्लुडीचे अभियंता प्रमोद कुलकर्णी यांना जबाबदार धरत त्यांना जागेवरच निलंबित करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी शिंदे समर्थकांनी काढलेली त्यांची व्हीडीयो क्लीप राज्यभर व्हायरल झाल्याने पीडब्लुडीत मोठा गोंधळ उडाला होता. प्रसार माध्यमांनी शिंदे यांनि थेट अनिल कपुर यांच्या 'नायक' चित्रपटाची जोड देत नायक म्हणून संबोधले. आता झाल्टा फाटा ते आडगाव आडगाव ते कांचणवाडी ते पैठण या मार्गावर शिंदे यांच्यातला नायक जागा होणार काय ? पीडब्लुडीतील जागतिक बँक प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता नरसिंग भंडे, उप अभियंता शरद सुर्यवंशी, नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडियाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे , सहाय्यक अभियंता आशिष देवतकर आणि कंत्राटदार जी.एन.आय. इन्फ्रास्ट्रक्चर यांना ते रस्त्यात थांबून पाचारण करून सवाल करतील काय? जागेवर सस्पेंड करतील काय असा सवाल औरंगाबादकर करत आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com