नागपूर जिल्हा बँकेच्या १५० कोटींची चौकशीत अडकणार का माजीमंत्री?

Nagpur
NagpurTendernama

नागपूर (Nagpur) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी (एनडीसीसी) बँकेत झालेल्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आरोपींकडून वसुली केली जावी, यासाठी अलीकडेच निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी नियुक्ती झाली. ८ सप्टेंबरपासून या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात होणार आहे. माजी मंत्री सुनील केदार हे या खटल्यातील मुख्य आरोपींपैकी एक आहेत, हे विशेष.

Nagpur
शिंदे-फडणवीस जोडी येऊनही 'समृद्धी'चे लोकार्पण लांबणीवर?

होम ट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रमणी मर्चंट्स प्रा. लि. आणि अन्य काही कंपन्यांकडून बँकेच्या रकमेतून २००१-०२ साली सरकारी प्रतिभूती खरेदी करण्यात आल्या होत्या. यात झालेल्या घोटाळ्यात चार राज्यांमध्ये एकूण १९ ठिकाणी गुन्हे दाखल झाले. या प्रकरणाचा खटला बरीच वर्षे रखडलेला आहे. तसेच, या प्रकरणातील आरोपींकडून अद्याप वसुली करून पीडितांना देण्यात आलेली नाही, या आशयाची याचिका ओमप्रकाश कामडी आणि अन्य काहींनी केली आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती अतुल चांदुरकर आणि न्यायमूर्ती उर्मीला जोशी-फाळके यांच्या समक्ष सुनावणी झाली. या घोटाळ्यातील आरोपींची जबाबदारी निश्चित करून त्याच्याकडून घोटाळ्याची रक्कम वसूल करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. पुढील सुनावणी २४ ऑगस्ट रोजी निश्‍चित करण्यात आली आहे. या वसुलीसंदर्भात राज्याच्या सहकार खात्याकडून एकसदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. आता या प्रकरणी पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती होताच पटेलसुद्धा ॲक्शन मोडमध्ये आलेत. या प्रकरणी ॲड. अजय घारे केदार यांच्यातर्फे बाजू मांडत आहेत.

Nagpur
नाशिकमधील घंटागाडीची टेंडर प्रक्रिया संशयाच्या फेऱ्यात; चौकशीचे...

साक्षीदारांची उलट तपासणी
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०च्या कलम ८८ नुसार, एनडीसीसी बँकेच्या चौकशीसंदर्भात अलीकडेच पूर्वतयारी सभा घेण्यात आली. याखेरीज आता ८ ते ११ सप्टेंबर या दरम्यान चौकशीची कारवाई होणार आहे. यात विविध साक्षीदारांची साक्ष नोंदविली जाईल तसेच त्यांची उलटतपासणीसुद्धा होईल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com