आता तुम्हालाही मिळेल नेहरू स्टेडियमवर खेळण्याची संधी; कारण...

Nehru Stadium
Nehru StadiumTendernama

पुणे (Pune) : स्वारगेट येथील महापालिकेच्या पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडिअममध्ये (Nehru Stadium) आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणे बंद झाल्यापासून हे स्टेडियम काही ठराविक लोकांच्याच वापरात होते. मात्र, महापालिकेच्या क्रीडा विभागाने आता नियमावलीची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. ११ पीच तज्ज्ञ प्रशिक्षकांना भाड्याने दिले असून, होतकरू विद्यार्थ्यांना क्रिकेटचे प्रशिक्षण मिळत आहेच. शिवाय पांढरा हत्ती ठरलेल्या स्टेडियममधून उत्पन्न मिळविण्यास सुरवात केली आहे. या स्टेडियमसाठी वर्षाकाठी २० लाख रुपये खर्च होत असताना क्रीडा विभागाला सुमारे ४५ लाखांचे उत्पन्न मिळत आहे.

Nehru Stadium
शिंदे गटाच्या 'या' आमदाराला ZPच्या निधीवाटपात मिळाला भोपळा!

या स्टेडिमयवर पुन्हा सामने खेळले जावेत यासाठी २०१५ मध्ये तब्बल चार कोटी रुपये खर्च करून स्टेडियम व मैदानाचे नूतनीकरण करण्यात आले. खेळाडूंसाठी सुविधा निर्माण करण्यात आल्या. पण त्यानंतरही त्याचा फारसा उपयोग झाला नाही. महापालिकेची क्रिकेट टीम व इतर काही टीमच या ठिकाणी सराव करत होत्या. या स्टेडियमचा शहरातील मुलांना प्रशिक्षणासाठी वापर करता यावा यासाठी क्रीडा विभागाने याठिकाणी १६ पीच तयार केल्या आहेत. त्यातील ११ पीच मान्यताप्राप्त प्रशिक्षकांना भाड्याने दिल्या आहेत. तर एक पीच महापालिकेच्या टीमसाठी व चार पीच या क्लब ऑफ महाराष्ट्राला दिल्या आहेत, असे क्रीडा विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांनी सांगितले.

Nehru Stadium
नाशिकमध्ये रिलायन्सच्या फार्मा कंपनीची ४२०० कोटींची गुंतवणूक

भाड्याने दिलेल्या पीचसाठी प्रतिमहिना १५ हजार रुपये घेतले जात आहेत. त्यातून दरवर्षी १९ लाख ८० हजार तर क्रिकेट सामन्यांसाठी स्टेडियम भाड्याने दिल्याने सुमारे २५ लाखाचे उत्पन्न असे एकूण ४४ लाख ८० हजार रुपये उत्पन्न वर्षाला मिळत आहे.

- संतोष वारुळे, उपायुक्त, क्रीडा विभाग, पुणे महापालिका

Nehru Stadium
पुणे-नाशिक विमानसेवेचे ग्रहण कधी सुटणार?

प्रशिक्षकांना पीच भाड्याने देताना ज्यांनी एल १, एल २ हे कोर्स केलेले आहेत त्यांना प्राधान्य दिले गेले. त्यानंतर रणजी सामने खेळलेले खेळाडू, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये पाच वर्ष प्रशिक्षकपदाचा अनुभव आहे त्यांना पीच भाड्याने दिल्या आहेत. एका प्रशिक्षकास जास्तीत जास्त २५ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देता येणार, असे संतोष वारुळे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com