बकोरिया इफेक्ट; साडेसहा वर्षांनंतर PMPचा दैनंदिन उत्पन्नाचा विक्रम

PMP
PMPTendernama

पुणे (Pune) : पीएमपीने (PMP) साडेसहा वर्षांनंतर पहिल्यांदाच दैनंदिन उत्पन्नाचा सुमारे दोन कोटी रुपयांचा टप्पा सोमवारी पार करण्यात यश मिळविले. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील सुमारे १३ लाख प्रवाशांनी पीएमपीच्या बसमधून या दिवशी प्रवास केला.

PMP
मोठी भरती; नाशिक झेडपी फेब्रुवारीत भरणार 2 हजार जागा

पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे १६५७ बस रस्त्यावर धावल्या. यापूर्वी ४ जानेवारी २०१६ रोजी २ कोटी रुपयांचे दैनंदिन उत्पन्न पार करण्यात पीएमपीएमएल ला यश आले होते. शाळा, महाविद्यालये आणि उद्योग पूर्ण क्षमतेने आणि नियमितपणे सुरू झाली असल्यामुळे प्रवासी संख्या वाढली आहे. तसेच एसी ई-बस आणि सीएनजीवर धावणाऱ्या बसचीही संख्या वाढती असल्यामुळे प्रवाशांची त्यांना पसंती मिळत आहे. यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसाठी पीएमपीचा प्रवास हा लाइफलाइनच्या दिशेने होत असल्याचा पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी सांगितले. पीएमपीच्या नियमित प्रवाशांतील पासधारकांच्या माध्यमातून प्रशासनाला १८ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. कामगार, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशांची संख्या वाढत असल्याचेही निरीक्षण त्यांनी नोंदविले.

PMP
शिंदे-फडणवीसांमुळे मोदींची बुलेट ट्रेन सुसाट; 135 किमीसाठी टेंडर

आळंदी यात्रेसाठी १७ ते २३ नोव्हेंबर दरम्यान ३०० बस प्रवाशांसाठी उपलब्ध असतील. त्यात २०३ जादा बसचा समावेश असेल. स्वारगेट, हडपसर, पुणे स्टेशन, महापालिका भवन, निगडी, पिंपरी, चिंचवड, देहूगाव, भोसरी, रहाटणी येथून आळंदी यात्रेसाठी १९ ते २२ नोव्हेंबर दरम्यान जादा बस सोडण्यात येणार आहेत. आळंदी यात्रेसाठी रात्री दहानंतरच्या बसप्रवासासाठी नेहमीपेक्षा जादा पाच रुपये आकारून प्रवासाची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ‘पीएमपी’ने कळविले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com