पुण्याची वाहतूक कोंडी फोडणाऱ्या 'या' प्रकल्पाचा मार्ग मोकळा

Traffic
Traffic Tendernama

पुणे (Pune) : पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरांतील नागरिकांसाठी गुड न्यूज आहे. या दोन शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी हाती घेण्यात आलेला रिंगरोड (Pune Ring Raod) मार्गी लागण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे पडले आहेत. या रस्त्याच्या भूसंपादनासाठी लागणारे अकरा हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्यास हुडकोने तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे भूसंपादनासाठी असलेली आर्थिक अडचण दूर होण्यास मदत होणार आहे.

Traffic
'त्या' फ्लोटिंग सौर उर्जा प्रकल्पाचे ५१४ कोटीचे टेंडर एसजीव्हीएनला

केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या पश्‍चिम भागातील रिंगरोडच्या मार्गास मध्यंतरी हिरवा कंदील दाखविल्याने या रस्त्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. त्यातच राज्य सरकारने या रस्त्याच्या भूसंपादनासाठी दीड हजार कोटी रुपये जाहीर केले आहेत.

Traffic
ऐन दिवाळीत मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे 'जॅम'; बोरघाटात...

आतापर्यंत केवळ ३५ कोटी रुपये भूसंपादनासाठी प्राप्त झाले आहे. त्यातून उर्से गावात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रत्यक्षात पश्‍चिम भागातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी किमान चार ते साडेचार हजार कोटी रुपये लागणार आहे. त्यानंतर बांधणीसाठी किमान सात हजाराहून कोटी रुपयांहून अधिक निधी लागणार आहे. यापूर्वी ‘ईपीसी’ तत्त्वावर या रस्त्याची उभारणी करण्याचा विचार होता. या पद्धतीमध्ये भूसंपादन करून रस्ता बांधणीचे काम निविदा काढून दिल्यानंतर संबंधित ठेकेदार कंपनीला टप्प्याटप्प्याने सरकार पैसे उपलब्ध करून देणार होते. परंतु रस्त्याचे काम खर्चिक असल्याने एवढा निधी उभा करणे सरकारला शक्य नाही, त्यामुळे हे काम बीओटी तत्त्वावर देता येईल, याची तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना एमएसआरडीसीला दिल्या होत्या. त्यानुसार एमएसआरडीसीने या संदर्भातील अहवाल तयार करून राज्य सरकारकडे पाठविला होता; मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही.

Traffic
'या' कारणामुळे कऱ्हाड पालिकेच्या उत्पन्नात पडली भर

एकीकडे ही प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे एमएसआरडीसीने या प्रकल्पासाठी कर्ज उभारण्याबाबतच्या पर्यायावर देखील काम सुरू होते. त्यात एमएसआरडीसीला यश आले आहे. या रस्त्याच्या भूसंपादनासाठी कर्ज देण्यास हुडकोने तत्त्वतः मान्यता दिल्याचे एमएसआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Traffic
Pune: पुणे-सोलापूर रस्त्यावर वाहनांच्या रांगा

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या रिंगरोडचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले आहे. पूर्व व पश्‍चिम असे रस्त्याचे दोन टप्पे आहेत. पश्‍चिम रिंगरोडला केळवडेपासून (ता. भोर) सुरुवात होणार असून हवेली, मुळशी आणि मावळ येथील उर्से टोलनाका येथे एकत्र येणार आहे. रिंगरोड हा ३७ गावांमधून जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com