चांदणी चौक : सातारा, मुंबईकडे जाणाऱ्यांसाठी 'हे' पर्यायी मार्ग...

chandani chowk
chandani chowkTendernama

पुणे (Pune) : चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याच्या कामामुळे मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशी व वाहनचालकांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. या संदर्भात पुणे पोलिसांनी काढलेल्या आदेशानुसार वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. हे बदल नेमके काय आहेत, त्यामुळे प्रवासाचा मार्ग कसा बदलणार आहे आणि पर्यायी मार्ग कसे असणार आहेत, याची माहिती पुणे पोलिसांनी प्रसिद्ध केली आहे. Pune Chandani Chowk

chandani chowk
धुळे-चाळीसगाव राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणात ठेकेदाराचा हलगर्जीपणा

पुणे शहरचे पोलिस उपायुक्त वाहतूक राहूल श्रीरामे यांनी स्पष्ट केले आहे की, वाहतुकीतील बदल १ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते २ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत अथवा आवश्यकतेनुसार पूल पाडण्याचे काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील. हे बदल ध्यानात घेऊन प्रवास करण्याची सूचना त्यांनी केली आहे.

chandani chowk
सिन्नर माळेगाव एमआयडीसीत 40 एकर जमीन घोटाळा; कोणी केली तक्रार?

वाहतुकीतील बदल

• मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडून येणारी जड वाहतूक ही ऊर्से टोलनाका येथेच थांबविण्यात येणार आहे.

• साताऱ्याकडून येणारी जड वाहतूक ही खेड शिवापूर टोलनाक्याजवळ थांबविण्यात येणार आहे.

• मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी ते ऊर्से टोलनाका या दरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी करण्यात येणार आहे.

• मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील डुक्कर खिंड ते पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील घोडावत चौक या दरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस बंदी राहील.

chandani chowk
आता मेट्रो-९च्या कारशेडचा वाद पेटला; भूसंपादनाला का होतोय विरोध?

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या हलक्या व प्रवासी चारचाकी वाहनांकरीता

• मुंबईकडून येणारी हलकी व प्रवासी चारचाकी वाहने ऊर्से टोलनाका येथून जुन्या पुणे- मुंबई रस्त्याने भक्ती शक्ती चौक, नाशिक फाटा, बोपोडी चौक, इंजिनीअरींग कॉलेज चौक, संचेती चौक, खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे - सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पूल डावीकडे वळून मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग.

• वाकड चौक डावीकडे वळून राजीव गांधी पुलावरुन विद्यापीठ चौक, संचेती चौक, उजवीकडे वळून खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पुल डावीकडे वळून मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग.

• राधा चौक डावीकडे वळून बाणेर रोडने विद्यापीठ चौक, उजवीकडे वळून संचेती चौक, उजवीकडे वळून खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पुल डावीकडे वळून मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग.

chandani chowk
'या' कारणामुळे रखडला नागपुरातील विधान भवनाचा विस्तार? वादग्रस्त...

साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या हलक्या व प्रवासी चारचाकी वाहनांकरीता

• खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, पुणे सातारा रोडने जेधे चौक, डावीकडे वळून सारसबाग, पुरम चौक, डावीकडे वळून टिळक रोडने खंडोजीबाबा चौक, फर्ग्युसन रोडने वीर चाफेकर चौक, डावीकडे वळून विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरून औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यू टर्न घेऊन मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग.

• खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, डावीकडे वळून नवले पूल, वडगांव पूल अंडरपास, सिंहगड रोडने राजाराम पूल, डी.पी. रोडमार्गे नळस्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यू टर्न घेऊन मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग.

• खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, डावीकडे वळून नवले पूल, वडगांव पूल, वारजे पूल अंडरपास, आंबेडकर चौक, वनदेवी चौक, कर्वे पुतळा चौक, नळस्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यू टर्न घेऊन मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com