पुणे मनपा आयुक्तांना दोषी कंत्राटदारांचा पुळका का? गौडबंगाल काय?

PMC
PMC Tendernama

पुणे (Pune) : पुणे शहरातील (Pune City) रस्त्यांची चाळण झाल्याने नागरिकांकडून टीकेची झोड उठवलेली असताना अखेर महापालिका (PMC) प्रशासनाने ठेकेदारांवर कारवाईचे पाऊल उचलले आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या १३ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून दणका दिला आहे तर पथ विभागाच्या सात कार्यकारी अभियंत्यांना सक्त ताकीद दिली आहे. कनिष्ठ अभियंता व शाखा अभियंत्यांना प्रत्येकी १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ही कारवाई केली आहे. (PMC Take Action On Contractor)
शहर अभियंत्यांनी त्यांच्या अहवालात ठेकेदारांना एका वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्याची शिफारस केली होती, तर उप अभियंता व शाखा अभियंत्यांना प्रत्येकी १० हजार रुपये दंड किंवा एक पगारवाढ रोखणे अशी शिक्षा सुचविली होती. मात्र, आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा कालावधी सहा महिन्यांचा केला तर अधिकाऱ्यांना १० ऐवजी १५ हजाराचा दंड ठोठावला आहे. शिक्षेचा कालावधी आणि दंड कमी केल्यामुळे आता टीका होऊ लागली आहे.

PMC
टोल भरून करा 'या' मृत्यूच्या महामार्गावरून प्रवास; ब्लॅकस्पॉटमुळे

पुण्यातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळातील रस्त्यांची चाळण झाल्याने नागरिक त्रस्त आहेत. रस्त्यांची पाहणी करण्यासाठी आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्तांनाही रस्त्यावर उतरावे लागले. त्यानंतर अहवाल सादर करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांची समिती नेमण्यात आली. त्यानंतर मुख्य पथ खात्याकडील दोष दायित्व कालावधीतील (डीएलपी) १३९ रस्त्यांची पाहणी मे. इंजिनिअर्स इंडिया लि. या त्रयस्थ संस्थेकडून करण्यात आली. त्यामध्ये १७ रस्त्यांच्या ठिकाणी सर्वाधिक रस्त्यांना खड्डे पडल्याचे निदर्शनास आले. रस्त्यांचे काम चांगल्या दर्जाचे न करणे आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी करून घेतले नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी १७ रस्त्यांचे निकृष्ट काम झाल्याने कारवाई करण्याचा प्रस्ताव आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे प्रस्तावित केला होता. त्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे. यामध्ये १७ रस्त्यांची कामे करणाऱ्या १३ ठेकेदारांना सहा महिन्यांसाठी काळ्या यादीत टाकणे, कनिष्ठ अभियंता व शाखा अभियंता यांची खातेनिहाय चौकशी करून प्रत्येकी १५ हजार रुपयांची शिक्षा करावी तर कार्यकारी अभियंत्यांना व्यवस्थित काम करण्याची सक्त ताकीद देण्याचे आदेश आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.

PMC
अबब! नाशिकमध्ये होणार 42 मजली मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब

काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदाराचे नाव व खराब झालेला रस्ता

दीपक कंस्ट्रक्शन - श्रीकंट्रोल चौक ते काळूबाई मंदिर, धायरी
धनराज असफाल्ट- पंचमी हॉटेल ते राजीव गांधी इ लर्निंग स्कूल
धनराज असफाल्ट - अहिल्यादेवी चौक ते तीन हत्ती चौक
मे. योगेश कंस्ट्रक्शन - केदारी पेट्रोल पंप रस्ता
मे. योगेश कंस्ट्रक्शन - राजीव गांधी नगर नॉर्थ वीर वस्ती
शुभम कंस्ट्रक्शन - लाल महाल चौक ते फडके हौद
शुभम कंस्ट्रक्शन - क्रीडासंकुल ते म्हाळुंगे गावठाण रस्ता
पाव्हवे कन्स्ट्रक्शन प्रा. लि.- गणेशखिंड रस्ता ते धोत्रे पथ
पाव्हवे कन्स्ट्रक्शन प्रा. लि. - हरेकृष्ण पथ
मे. एस. एस. कंस्ट्रक्शन- नानसी लेक होम्स ते पद्मजा पार्क रस्ता
देवकर अर्थमुव्हर्स - शिवाजी रस्ता गोटीराम भैय्या चौक
विनोद मुथा- लोहियानगर, कासेवाडी रस्ता
गणेश एंटरप्रायझेस - महंमदवाडी रस्ता महापालिका शाळा ते मारगोसा सोसायटी
सनशाईन कंस्ट्रक्शन -ताडीगुत्ता चौक ते सीसी रस्ता
यू. आर. फॅसिलिटी - संगमवाडी ते टिंगरेनगर रस्ता
श्रेयस कंस्ट्रक्शन - उत्तरेश्‍वर रस्ता लोहगाव
आदर्श भारत एनव्हॅरो प्रा. लि.- बावधन मुख्य रस्ता

PMC
अखेर चांदणी चौकातील पूल पाडण्याची तारीख ठरली; विभागीय आयुक्तांनी..

महापालिकेने आता मुख्य खात्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई केली आहे. पुढच्या टप्प्यात क्षेत्रीय कार्यालयाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकले जाईल. निकृष्ट काम होऊनही त्याकडे दुर्लक्ष केलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार आहे.
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महानगरपालिका

PMC
पुरंदरमधील विमानतळाच्या भूसंपादनात आता 'हा' अडथळा...

लाखो पुणेकर खड्ड्यांमुळे हैराण झाले असताना त्यासाठी जबाबदार कंत्राटदारांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकणे आवश्यक होते जेणेकरून त्यांना पुणे महापालिका तसेच अन्य कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रस्त्यांची कामे मिळणे कायमस्वरूपी बंद होणे गरजेचे आहे. महापालिका आयुक्तांना खराब रस्त्यांमुळे यातना सहन करणाऱ्या पुणेकर नागरीकांविषयी कळवळा येत नाही मात्र दोषी कंत्राटदारांचा मात्र पुळका येतो हे काय गौडबंगाल आहे?

- विवेक वेलणकर,अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com