गडकरीजी, क्या हुआ तेरा वादा...पुणेकरांना तिसऱ्यांदा 'कात्रजचा...

Nitin Gadkari
Nitin GadkariTendernama

पुणे (Pune) : Traffic Problem In Pune पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी केबलच्या साहाय्याने हवेत उडणारी कार, रोप-वे, तसेच ट्रॉली बसचा पर्याय केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सुचविला आहे. प्रत्यक्षात पुणे शहरात पायी चालत फिरणेदेखील मुश्कील बनले आहे. काही वर्षांपूर्वी रस्त्याचे सुरू झालेले काम अजूनही अपूर्णच आहे. कोट्यवधींचा खर्च करून बांधलेल्या पुणे-सातारा रस्त्यावर (Pune - Satara Road) त्रुटी आढळल्याने आता पुन्हा या रस्त्यावर काम केले जाणार आहे. याच्या ‘डीपीआर’ला देखील पुन्हा सुरवात झाली. रिंगरोडचा प्रश्नदेखील असाच अर्धवट आहे. या स्थितीत पुण्यात हवेत उडणारी कार म्हणजे गडकरींनी हवेत बांधलेले आश्वासनांचे ‘इमले’ आहेत का, असा प्रश्न पडला आहे.

Nitin Gadkari
मुंबईतील सर्वात जुन्या पुलांपैकी एक कर्नाक ब्रिजचे पाडकाम सुरु

चांदणी चौक (Chandani Chowk) येथील वाहतूक कोंडी व पाडण्यात येणाऱ्या पुलाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी पुण्यातील वाहतूक समस्यांबाबतीत विविध उपाय, संकल्पना मांडल्या. गडकरींनी मांडलेल्या या संकल्पना वस्तुस्थितीपासून कोसो दूर आहेत, अनेक स्वप्नवत आश्वासने देताना गडकरी यांनी कोणताही ठोस उपाय मांडला नाही.

Nitin Gadkari
नागपूर जिल्हा परिषदेचे सदस्यच झाले ठेकेदार?

काय म्हणाले गडकरी?
- पुणे-सातारा रस्त्यावर वाहनाची संख्या वाढली, सेवा रस्त्याबाबत काही सुधारणा करायच्या असल्याने पुन्हा एकदा डीपीआर करणार
- पुणे-शिरूर-नगर-औरंगाबाद रस्त्यावर ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत तीन मजली उड्डाणपूल होणार, त्याचे डिझाईनदेखील तयार झाले
- पुणे-बंगळूर ग्रीनफिल्ड कॉरिडॉरमुळे बंगळूर ते मुंबई साडेचार तास; तर पुणे-बंगळूर साडेतीन तास गाठणे शक्य होणार
- पुणे व मुंबईतला ताण कमी करण्यासाठी सुरत ते चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडॉरचे काम सुरू
- पुणे-औरंगाबाद रस्त्याचे जमीन हस्तांतराचे काम सुरू
- पुण्यातील रिंगरोडसाठी सुमारे १३ हजार कोटींचा खर्च; केवळ जमीन हस्तांतर होणार, यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणदेखील स्वतःच्या खर्चाने काही रस्ते करणार
- पुणे-सोलापूर रस्त्यावरील अपघातांची संख्या कामी करण्यासाठी काही ठिकाणी उन्नत मार्ग, तर काही भुयारी मार्ग करणार
- हडपसर ते यवत दरम्यान उन्नत मार्ग करणार

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com