पुणेकरांना सुखद धक्का; ठेकेदाराशिवाय महापालिकेने करून दाखविले...

PMC
PMCTendernama

पुणे (Pune) : पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वाहनतळावर ठेकेदार हे ठरलेल्या पैशांपेक्षा जास्त पैसे घेतात, जाब विचारल्यावर दादागिरी करतात, अशी तक्रारी महापालिकेकडे वारंवार येतात. पण, सध्या पुणेकरांना एक सुखद अनुभव येत आहे. ठेकेदाराविना महापालिका चार वाहनतळ चालवत आहे, तेथे सुरक्षारक्षक किंवा अतिक्रमण विभागाचे कर्मचारी रीतसर पावती देतात अन् ठरल्याप्रमाणे पैसे घेतात. लूटमार वगैरे होत नसल्याने त्याची तक्रारही येत नाही. मंडईतील दोन्ही प्रमुख वाहनतळासह अन्य दोन वाहनतळ गेल्या १३९ दिवसांपासून महापालिका चालवत आहे, त्यातून ४५ लाख ५८ हजार ३१० रुपये उत्पन्न मिळाले आहे.

PMC
ठाकरेंच्या निर्णयांना स्थगिती का दिली; न्यायालय म्हणाले शिंदेंना..

पुणे महापालिकेचे शहरात ३० वाहनतळ आहेत. हे वाहनतळ ठेकेदारांना भाड्याने देऊन त्यातून एका वर्षाला सुमारे सहा कोटींचे उत्पन्न अपेक्षीत आहे. महापालिकेच्या वाहनतळाचे व्यवस्थापन आणि संचलन करण्यासाठी ठेकेदार नियुक्त केले जातात. पूर्वी ३० वाहनतळांसाठी ३० ठेकेदार नियुक्त केले होते. पण, या प्रत्येक ठेकेदारावर नियंत्रण ठेवणे अवघड जात असल्याने ३० वाहनतळांची ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’, ‘इ’ या पाच विभागांत वाटणी करून विभागनिहाय टेंडर काढण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये केवळ ‘क’ विभागातील १० वाहनतळांचे काम एका ठेकेदाराला दिले आहे. उर्वरित विभागांसाठी टेंडरची रक्कम एक कोटीच्या पुढे असल्याने ठेकेदारांनी टेंडर भरले नाही. त्यामुळे पुन्हा प्रत्येक वाहनतळाचे स्वतंत्र टेंडर काढण्याची नामुष्की आली.

PMC
स्वारगेट-कात्रज मेट्रोबाबत मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा..

महापालिकेच्या १७ वाहनतळांच्या टेंडर निघाले आहेत, तर काही ठिकाणी जुन्या करारांची अंमलबजावणी सुरू आहे. तसेच चार ठिकाणी ठेकेदार नसल्याने मध्यवर्ती भागातील गर्दीच्या ठिकाणांवरील वाहनतळ बंद पडले होते. ठेकेदार नियुक्त होईपर्यंत हे वाहनतळ महापालिकेने स्वतःचे कर्मचारी नियुक्त करून सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यातून महापालिकेला चांगले उत्पन्न मिळत असल्याचे समोर आले आहे.

PMC
सुरत-चेन्नई ग्रीनफिल्डमुळे नाशकातील ६ तालुक्यांतील शेतकरी मालामाल

असे चालते वाहनतळ
महापालिकेने वाहनतळ चालविण्यासाठी संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना सुरक्षारक्षक किंवा अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तेथे नियुक्त करण्याचे आदेश दिले. सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत हे वाहनतळ सुरू असतात. त्यामध्ये महात्मा फुले मंडईतील कै. सतीशशेठ मिसाळ (मिनर्व्हा), हुतात्मा बाबूगेनू वाहनतळ (आर्यन), हमालवाडा येथील कै. शिवाजीराव आढाव वाहनतळ आणि पुणे स्टेशन येथील कै. तुकारामशेठ शिंदे या चार वाहनतळांचा समावेश आहे. या प्रत्येक वाहनतळावर पाच ते सहा कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. तेथे निश्चित केलेल्या रकमेनुसार वाहनचालकांकडून पैसे घेऊन त्यांना पावती दिली जात आहे. दररोजच्या रकमेचा भरणा थेट महापालिकेच्या बँक खात्यात जमा होत असून, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक उप अभियंता नियुक्त केला आहे. आतापर्यंत या चार वाहनतळांच्या माध्यमातून ४५ लाख ७८ हजार ३१० रुपये बँक खात्यात जमा झाले आहेत.

PMC
दिवाळीत म्हाडाच्या ४ हजार घरांसाठी लॉटरी; या भागातील घरांचा समावेश

महापालिकेचे जे वाहनतळ बंद आहेत, तेथे यंत्रणा लावून ते सुरू केले. याठिकाणी जमा होणारे दररोजचे शुल्क बँक खात्यात जमा केले जाते. आतापर्यंत ४६ लाख ७८ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.

- डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, मनपा

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com