Pune: गंगाधाम चौकातील कोंडी फोडण्यासाठी प्रशासकांचे मोठे पाऊल!

Flyover
FlyoverTendernama

पुणे (Pune) : मार्केट यार्ड, बिबवेवाडी भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गंगाधाम चौकात उड्डाणपूल, भुयारी मार्ग (ग्रेड सेपरेटर) आणि २४ मीटरचा रस्ता करण्यास शुक्रवारी महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. शहरातील हा पहिलाच क्रेडिट नोटवरील प्रकल्प ठरणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेवर प्रशासक आल्यानंतर त्यांच्याकडून केवळ देखभाल दुरुस्तीच्या कामांना मंजुरी दिली जात होती, पण यानिमित्ताने शहरातील नव्या प्रकल्पांना गती देण्याचे काम केले आहे. (Gangadham Chowk Flayover, Subway)

Flyover
नितीन गडकरींचे 'हे' आश्वासन प्रत्यक्षात येणार का?

मार्केट यार्ड परिसरात अवजड वाहतुकीमुळे कायम वाहतूक कोंडी असते. या चौकातील कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बांधला जाणार आहे. तसेच कात्रजकडून बिबवेवाडीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र २४ मीटर रुंदीचा रस्ता केला जाणार आहे. २४ डिसेंबर २०२१ रोजी महापालिकेच्या सभागृहात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९च्या कलम २०५ अन्वये हा रस्ता आखण्यात आला. त्यावरून सभागृहात आरोप-प्रत्यारोप झाले होते, तरीही भाजपने बहुमताच्या जोरावर हा विषय मंजूर केला होता. त्यानंतर आता थेट त्याचे टेंडर मंजूर केले आहे.

Flyover
आयफेल टॉवरपेक्षाही जास्त उंच आहे भारतातील 'हा' पूल; लवकरच...

असा आहे प्रकल्प?

उड्डाणपूल

बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर ५२० मीटर लांबीचा व १६ मीटर रुंदीचा उड्डाणपूल बांधला जाईल. या उड्डाणपुलाची बहुतांश जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. बिबवेवाडीच्या बाजूने जेथे उड्डाणपूल सुरू होतो, तेथे काही खासगी मिळकतीच्या फ्रंट मार्जिनमधील जागा संमतीने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा पुण्यातील सर्वांत कमी लांबीचा उड्डाणपूल ठरणार आहे.

Flyover
दिव्यांग फ्रेंडली फूटपाथ:चेंबूरमध्ये पायलट प्रोजेक्ट, 17 कोटींचे..

भुयारी मार्ग

आईमाता मंदिर ते मार्केट यार्ड या दरम्यान ४६० मीटर लांबीचा आणि १३.५० मीटर रुंदीचा भुयारी मार्ग (ग्रेड सेपरेटर) बांधला जाईल. यासाठीही २०१७ च्या विकास आराखड्यानुसार रस्त्यासाठीची काही जागा ताब्यात घेतली जाणार आहे. या ग्रेड सेपरेटरमधून मार्केट यार्डातील अवजड ट्रकदेखील जातील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या कामात एक नाला आडवा जात आहे, पण तो वळविण्यात येणार आहे.

Flyover
मुंबईत एसी ई-डबल डेकर बसचा मुहूर्त ठरला; 900 बसेसचा समावेश

चोवीस मीटर रस्ता

कात्रजवरून बिबवेवाडी किंवा उलट दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी आईमाता मंदिर ते झाला कॉम्प्लेक्स या दरम्यान स्वतंत्र २४ मीटरचा रस्ता केला जाणार आहे. या रस्त्यासाठीची ७० टक्के जागा ताब्यात आली असून, उर्वरित ३० टक्के जागा तडजोडीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, या प्रकल्पात सर्वांत आधी याच रस्त्याचे काम सुरू करण्याचे नियोजन असल्याने भूसंपादनाचा विषय लवकर मार्गी लावणे आवश्यक आहे.

Flyover
नितीन गडकरींचे 'हे' आश्वासन प्रत्यक्षात येणार का?

पीपीपी क्रेडिट नोट

हा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या धर्तीवर डेव्हलपमेंट क्रेडिट नोट या मोबदल्यात निखिल कन्स्ट्रक्शन ग्रुपतर्फे हा ९२ कोटी ३२ लाख १४ हजार १६६ रुपयांचा प्रकल्प केला जाणार आहे. क्रेडिट नोटमुळे महापालिकेला थेट पैसे द्यावे लागणार नाहीत. हे पैसे संबंधित ठेकेदार बांधकाम शुल्क, खोदाई शुल्क, मिळकतकर यांसह इतर शुल्कातून वळते करून घेईल किंवा त्यास ही नोट खासगी बाजारातदेखील विकता येणार आहे.

Flyover
'इंधन गाड्यांच्या किमतीप्रमाणे होतील इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती'

स्थायी समितीमध्ये गंगाधाम चौकातील प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. यासाठी क्रेडिट नोटचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे या भागातील वाहतूक सुरळीत होईल.

- विक्रमकुमार, प्रशासक, महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com