पुणे महापालिकेने काढलेल्या टेंडरवरच ठेकेदारांकडून आक्षेप

PMC
PMCTendernama

पुणे (Pune) : जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी काढण्यात आलेल्या दोन टेंडरच्या अटी व शर्तींमध्ये विशिष्ट हेतूने बदल केल्याचा आरोप करत ठेकेदार कंपन्यांनी आपला आक्षेप नोंदवला आहे.

PMC
जलसंधारणमध्ये बदल्यांचे गँगवॉर; थेट उच्चपदस्थांच्या खुर्चीलाच हात?

उरळी देवाची येथील आठ लाख टन जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया (बायोमायनिंग) करण्यासाठी महापालिकेकडून टेंडर काढण्यात आले आहे. या टेंडरमधील अटी शर्तीवर अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहे. दरम्यान या कामासाठी आठ ठेकेदार कंपन्या पुढे आल्या आहेत. त्यावर प्रशासनाकडून या ठेकेदार कंपन्यांची प्रीबीड मिटींग (टेंडर भरण्यापूर्वीची बैठक) घेण्यात आली. या बैठकीला घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी यांच्यासह आठही कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यामध्ये काही कंपन्यांच्या प्रतिनिधींनी टेंडरमधील अटी-शर्तींवरून प्रशासनाकडे प्रश्‍न उपस्थित केले असल्याचे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले.

PMC
पुणे महापालिकेचा सुपर निर्णय; आता ठेकेदारांना एका खड्ड्याला ५ हजार

उरळी देवाची येथील ९ लाख टन जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडून यापूर्वी टेंडर काढण्यात आले होते. ते टेंडर आणि नव्याने आठ लाख टन जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी काढण्यात आलेल्या अटी-शर्तींची तपासणी केली असता, नऊ लाख टन कचऱ्यापेक्षा ८ लाख टन कचऱ्याला अधिक अटी असल्याचे दिसत आहे. आता उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर टेंडरमधील अटी-शर्तीचा महापालिका फेरविचार करणार काय, याकडे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com