कल्याणला मिळणार नवी 'स्मार्ट' ओळख; 70वर्षे जुना ST डेपो टाकणार कात

Kalyan ST Bus Depo
Kalyan ST Bus DepoTendernama

मुंबई (MumbaI) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRDC) कल्याण बस डेपोचे (Kalyan Bus Depot) रुपडे लवकरच पालटणार आहे. कल्याण स्मार्ट सिटी (Smart City Kalyan) अंतर्गत या डेपोचा कायापालट होणार आहे.

Kalyan ST Bus Depo
5 हजार कोटींचे राष्ट्रीय महामार्ग बांधले पण उपयोग शून्य; कारण...

या डेपोला सुमारे 70 वर्षे झाली आहेत, त्यामुळे अत्यंत धोकादायक झालेल्या डेपोच्या विकासाला एसटी महामंडळाने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. तसेच डेपोच्या विकासासाठी आराखडे आणि नकाशांना मंजुरी मिळाली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण शहरात अनेक प्रकल्प सुरू आहेत.

Kalyan ST Bus Depo
नितीन गडकरी नाशिकमध्ये कोणती मोठी घोषणा करणार?

कल्याण बस आगार 17,719 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत पूर्वी बांधण्यात आले होते. नूतनीकरणांमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने कार्यालय, लेखा विभाग, डेपो व्यवस्थापक, प्रवासी प्रतीक्षालय, स्वच्छतागृह, वॉशिंग एरिया, मेकॅनिकल एरिया, इंधन पंप, यूपिटस, थ्रूपिटस, 18 फलाट, बस स्थानक, तळमजला बस स्थानक, तळमजला व्यावसायिक इमारत व बस आगाराचा परिसर तसेच 81 बसेससाठी नाईट पार्किंगची सुविधा या आराखड्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Kalyan ST Bus Depo
अतिक्रमणांतील १३ हजार प्रकरणांबाबत नाशिक जिल्हा प्रशासनासमोर पेच

कल्याण स्टेशन परिसरातून मार्गक्रमण करणे सुसह्य होण्याच्या दृष्टीने स्टेशन समोर बैल बाजार चौक ते नेताजी सुभाष चंद्र बोस चौक हा सुमारे 1100 मीटर लांबीचा उड्डाणपूल प्रस्तावित आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेस एसटी डेपोमध्ये ये-जा करण्यासाठी स्वतंत्र मार्गिका प्रस्तावित आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस चौक मार्गे बैल बाजार दिशेने येणारी वाहतूक समोरून भानुसागर थिएटर मार्गे कल्याण बैल बाजार स्मशानभूमी येथे एक दिशा मार्ग असणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com