सिडकोची मेगामुंबईत दिवाळीभेट; ७,८४९ जणांची होणार स्वप्नपूर्ती

CIDCO
CIDCOTendernama

मुंबई (Mumbai) : दिवाळीनिमित्त सिडकोने मेगामुंबईतील ७,८४९ घरांच्या सोडतीची घोषणा केली आहे. उद्यापासून या घरांसाठी नोंदणी करता येणार आहे. या सोडतीमुळे सर्वसामान्यांची नवी मुंबईत स्वप्नपूर्ती होणार आहे. ही घरे नवी मु्ंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नेरूळ-उरण रेल्वे मार्गाजवळ आहेत. नवी मुंबई आणि पनवेल परिसरात सिडको एक लाख घरे उपलब्ध करणार असून आतापर्यंत जवळपास २५ हजार घरे सिडकोने विक्री केली आहेत.

CIDCO
ठाण्यापाठोपाठ 'या' शहरातही 'सॅटीस'ची अंमलबजावणी; ८१ कोटी मंजूर

नव्याने उभारण्यात येत असलेल्या गृहसंकुलांमध्ये उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा असणार आहेत. गृहसंकुलांच्या परिसरात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आदी सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उत्पन्न मर्यादा ही तीन लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्याशिवाय, दोन लाख ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सदनिका उपलब्ध असणार आहे. सिडकोने जाहीर केलेली ही घरे नवी मुंबईतील खारकोपर, बामणडोंगरी इथे आहेत. प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ, ट्रान्सहार्बर रोड या नजीक हा गृह निर्मिती प्रकल्प आहे. घरांच्या लॉटरीसाठी उद्यापासून (ता. २५) नोंदणी करता येईल.

CIDCO
'या' पुलामुळे अलिबाग, नवी मुंबई येणार आणखी मुंबईजवळ; 900 कोटींचे

त्याचसोबत सिडकोने ऑगस्ट २०२२ मध्ये काढलेल्या ४ हजार १५८ घरांच्या नोंदणीसाठी ३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा, खारघर नोडमध्ये ही घरे आहेत. परवडणाऱ्या दरातील या ४१५८ घरांपैकी ४०४ घरे ही पंतप्रधान आवास योजनेतंर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आणि ३ हजार ७५४ घरे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत. त्यात २४५ व्यापारी गाळ्यांची लॉटरी काढण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com