कल्याण-डोंबिवली-टिटवाळा वासियांना MMRDAकडून गुड न्यूज!

Ring Road
Ring RoadTendernama

मुंबई (Mumbai) : कल्याण-डोंबिवली-टिटवाळा या महत्त्वाकांक्षी रिंगरोडच्या टप्पा-३चे टेंडर येत्या १० ऑक्टोबर रोजी एमएमआरडीए (MMRDA) प्रसिद्ध करणार आहे. तर टप्पा ८ मध्ये हा रिंगरोड थेट कल्याण - अहमदनगर (Kalyan - Ahmednagar) राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार असल्याने प्रवासाची डोकेदुखी आणि वेळेतही मोठी बचत होणार आहे. (Kalyan - Dombiwali - Titwala Ringroad)

Ring Road
मुंबईतील मेट्रोसाठी सल्लागाराची नेमणूक; २६८ कोटीच्या टेंडरवर मोहोर

महत्त्वाकांक्षी रिंगरोडच्या टप्पा-३चे टेंडर १० ऑक्टोबर रोजी एमएमआरडीए जाहीर करणार आहे. यात ८६ टक्के भूसंपादन पूर्ण करण्यात यश आले असून या कामामुळे या रिंगरोड प्रकल्पाला गती मिळेल. याच रिंग रोड प्रकल्पातील टप्पा ४ ते ७ मधील अडथळे दूर करत त्या कामाला गती दिली जाईल, या कामासाठी आवश्यक भूसंपादन पूर्ण करण्यासाठी बाधितांना तात्काळ बीएसयूपी घरांचे वाटप केले जाईल, यामुळे दुर्गाडी ते टिटवाळा हा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर येईल.

Ring Road
अशोक चव्हाणांचे प्रयत्न अन् जालना-नांदेड मार्गासाठी 'हुडको'कडून...

रिंग रोड प्रकल्पातील टप्पा १, २ आणि ८ ची भूसंपादन प्रक्रिया सुरू करून कामाला गती दिली जाईल. रिंग रोड प्रकल्पात टप्पा क्रमांक सातनंतर टिटवाळ्याच्या रुंदे येथील रस्ता पुढे टप्पा ८ मध्ये थेट कल्याण - अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाला गोवेली येथे जोडला जाईल, त्यामुळे प्रस्तावित रिंग रोड खऱ्या अर्थाने परिपूर्ण होणार आहे.
शहाड येथील अरुंद पुलाच्या रुंदीकरणावर शिक्कामोर्तब झाले असून हा पूल १० मीटरचा असून त्याला ३० मीटर करण्यास तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. विठ्ठलवाडी ते शहाड या उन्नत पुलाच्या उभारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे वेळखाऊ प्रवास जलद होईल. डोंबिवली - मानकोली पुलाचे काम पूर्ण करून हा मार्ग एप्रिल २०२३ पर्यंत वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यामुळे डोंबिवली - ठाणे प्रवास १५ मिनिटांवर होणार आहे.

Ring Road
EXCLUSIVE : फडणवीसांच्या खात्यात भ्रष्टाचाराचे टोक;टक्केवारीसाठी..

कल्याण-डोंबिवली-टिटवाळा परिसरात एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीए मुख्यालयात नुकतेच बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विविध विषयांवर निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीला एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास, अतिरिक्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर आदी उपस्थित होते. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com