'या' महापालिकेची आयडियाची कल्पना;टाकाऊतून उपयुक्त वस्तू निर्मितीचा

crusher
crusherTendernama

मुंबई (Mumbai) : सध्या सर्वच शहरांमध्ये दिसेल त्या ठिकाणी टाकला जाणारा राडारोडा हा नागरिकांची आणि प्रशासनाची मोठी डोकेदुखी बनतो आहे. त्यावर नवी मुंबई महापालिकेने अत्यंत कल्पक मार्ग शोधला आहे. काय आहे ही आयडियाची कल्पना वाचा सविस्तर...

crusher
'शिंदे-फडणवीस अजून एक प्रकल्प राज्याबाहेर चाललाय, माहिती आहे का?'

नवी मुंबई महापालिकेच्या टाकाऊतून उपयुक्त वस्तू निर्मिती प्रकल्प राज्यातील सर्व मोठ्या शहरांसाठी आदर्शदायी ठरला आहे. या प्रकल्पाअंतर्गत शहरातील राडारोड्यावर प्रक्रिया करण्यात येऊन त्याद्वारे खडी, रेती आणि पेव्हर ब्लॉक तयार करण्यात येत आहेत. गेल्या ३ वर्षात ४ लाखांहून अधिक पेव्हरब्लॉक, ७६८२ मेट्रिक टन रेती आणि ९३९५ मेट्रिक टन खडी निर्मिती झाली आहे. ज्यामुळे शहराचे विद्रुपीकरण टळलेच शिवाय टाकाऊतून उत्पन्नही सुरु झाले. नवी मुंबई शहरातील खारफुटी, कांदळवन, मोकळ्या भूखंडावर अनधिकृतपणे टाकल्या जाणाऱ्या राडारोड्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 'डेब्रिज ऑन कॉल' तसेच 'भरारी पथक कारवाईच्या माध्यमातून तुर्भे येथे राडारोड्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. या प्रकल्पातून आतापर्यंत ३० हजार मेट्रिक टन राडारोड्यावर प्रक्रिया करण्यात आली असून त्याद्वारे ४ लाखांहून अधिक पेव्हरब्लॉक निर्मिती करण्यात आलेली आहे.

crusher
नवी मुंबई महापालिकेच्या 'त्या' टेंडरला वर्षाची मुदतवाढ;ठेकेदारास..

नवी मुंबई महापालिका घनकचरा व्यवस्थापनात देशातील अग्रगण्य शहर म्हणून राष्ट्रीय स्तरावर नावाजले जात असताना शहरात विनापरवानगी कुठेही टाकण्यात येणाऱ्या राडारोडामुळे शहर सौंदर्यीकरणाला खीळ बसत होती. महापालिका स्तरावर यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच राडारोड्याची व्हिलेवाट लावून त्यापासून उपयुक्त वस्तू निर्मिती करण्याचा प्रकल्प सन २०१९ मध्ये उभारण्यात आला. शहरातील मोकळ्या भूखंडावर राडारोड्याचे होणारे अतिक्रमण थांबविण्यासाठी राडारोडा नियंत्रक भरारी पथके नेमण्यात आली होती. मात्र तरीदेखील शहरात राडारोडा मोकळे भूखंड, रस्ताच्या कडेला कुठेही टाकण्यात येत होता. त्यामुळे डेब्रिज ऑन कॉलची सुविधा उपलब्ध करून निर्मिती होते त्याच ठिकाणाहून राडारोडा उचलण्यात येत आहे. तुर्भेतील कचराभूमीच्या बाजूला असलेल्या ३४ एकर जमिनीपैकी ३.५ एकर जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. या प्रकल्पासाठी ७ कोटी ३८ लाख ९२ हजार ९३४ रुपये खर्च करण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत राडारोडा कचरा प्रक्रिया मशीनमधून प्रतितास २० टन राडारोड्यावर प्रक्रिया होते. या मशीनची दिवसाला १०० ते १५० टनांपर्यंतच्या राडारोड्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. सद्यस्थितीत शहरातील सरासरी ३० ते ३५ मे.टन राडारोड्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. त्यातून खडी, रेती आणि पेव्हर ब्लॉक तयार करण्यात येत आहेत.

आतापर्यंत डेब्रिज प्रक्रिया- ३० हजार मेट्रिक टन
पेव्हर ब्लॉक निर्मिती आणि वापर – ४ लाख १४ हजार ३३६
रेती – ७६८२ मेट्रिक टन
खडी – ९३९५मेट्रिक टन

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com