नरिमन पॉईंट ते कुलाबा प्रवास 'असा' होणार सुपरफास्ट; MMRDAचं ठरलं..

MMRDA
MMRDATendernama

मुंबई (Mumbai) : कुलाबा, चर्चगेट, नरिमन पॉईंट भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी एमएमआरडीएने (MMRDA) १.६ किमी लांबीचा नरिमन पॉईंट ते कुलाबा (Nariman Point To Colaba) दरम्यान उन्नत मार्ग उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

MMRDA
राज्याचा मेकओव्हर करणाऱ्या 'या' ३६ प्रकल्पांवर थेट सीएमओचे लक्ष

नरिमन पॉईंट - कुलाब्यादरम्यानचे अंतर केवळ पाच मिनिटांत पार करता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) येथे उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भविष्यात या परिसरात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता याव्यतिरिक्त नरिमन पॉईंट ते वर्ल्ड ट्रेड रोड (साधू वासवानी रोड) दरम्यान आणखी एक उड्डाणपूल बांधावा अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि रहिवाशांनी एमएमआरडीएकडे केली आहे. या उड्डाणपुलाबाबत व्यवहार्यता तपासल्यानंतर एमएमआरडीए अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.

MMRDA
ठेकेदारांनो, नाशिकमध्ये रस्ते खोदण्यासाठी ३० एप्रिलपर्यंतच मुदत

कुलाबा, चर्चगेट, नरिमन पॉईंट भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी एमएमआरडीएने १.६ किमी लांबीचा नरिमन पॉईंट ते कुलाब्यादरम्यान उन्नत मार्ग उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरवात होणार आहे. या पुलामुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. मात्र येत्या काळात नरिमन पॉईंट, कुलाबा भागात मोठ्या संख्येने पुनर्विकास होणार आहे. त्यामुळे येथील लोकसंख्या, वाहनांची संख्या वाढणार आहे. भविष्यातील येथील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या उन्नत मार्गाव्यतिरिक्त येथे आणखी एक उड्डाणपूल बांधावा अशी मागणी माजी नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांनी आणि काही रहिवाशांनी केली आहे. या संदर्भात नुकतेच महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि कुलाबा मतदारसंघातील आमदार राहुल नार्वेकर, महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीत नरिमन पॉईंट ते वर्ल्ड ट्रेड रोडदरम्यान पूल बांधण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती हर्षिता नार्वेकर यांनी दिली.

MMRDA
मुंबई-अहमदाबाद मार्गावर मिनी बुलेट ट्रेनचा थरार; वाचा सविस्तर...

एमएमआरडीए नरिमन पॉईंट ते कुलाब्यादरम्यान उन्नत मार्ग बांधणार आहे. मात्र लवकरच या परिसरात पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प राबविले जाणार आहेत. त्यामुळे भविष्यातील वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून नरिमन पॉईंट ते वर्ल्ड ट्रेड रोडदरम्यान एक उड्डाणपूल बांधण्याची मागणी करण्यात आली आहे. एमएमआरडीए या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणी करणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com