टेंडरआधीच सल्लागार फितूर; 400 कोटींच्या कामाचे डॉक्यूमेंट केले लिक

Deonar Abattoir
Deonar AbattoirTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेच्या (BMC) देवनार कत्तलखाना (Deonar Abattoir) आधुनिकीकरण टेंडर (Tender) संदर्भात प्रशासनाने कानाडोळा केल्याचा आरोप भाजपने (BJP) केला आहे. काही महिन्यांपूर्वी देवनार कत्तलखाना आधुनिकीकरणाच्या ४०० कोटींच्या टेंडरमधील त्रूटी बाहेर आल्याने हे टेंडर रद्द झाले. सल्लागाराने संबंधित कंत्राटदाराला (Contractor) टेंडर आधीच कागदपत्रे पुरवली, त्याबाबत कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे सांगत भाजपने हे प्रकरण आता पुन्हा लावून धरले आहे. संबंधित सल्लागारावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपने महापालिका आयुक्तांकडे केली असल्याची माहिती भाजपचे महापालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.

Deonar Abattoir
डॉ. खेमणार कारवाई कराच; ठेकेदार धार्जिणे 'ते' 5 अधिकारी कोण?

काही महिन्यांपूर्वी देवनार कत्तलखान्याच्या आधुनिकरणासाठी ४०० कोटी रुपयांच्या कामासाठी महापालिकेने टेंडर प्रसिद्ध केले होते. मात्र भाजपने या टेंडरमधील त्रूटी बाहेर काढून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. भाजपने हे प्रकरण लावून धरल्याने प्रशासनाने हे टेंडर रद्द केले. यामधील गंभीर बाब म्हणजे या कामात सल्लागाराने टेंडर निघण्यापूर्वीच संबंधित कंत्राटाची काही कागदपत्रे या टेंडरमध्ये भाग घेणाऱ्या कंत्राटदारांना पुरविली होती. सल्लागार व कंत्राटदार यांचे संगनमत होते व त्यामधूनच टेंडर भरण्यासंदर्भात ही कागदपत्रे दिली गेली होती, असा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

Deonar Abattoir
मोठी बातमी : मुंबई मेट्रोचे कारशेड आरेमध्येच; शिंदेंनी बंदी उठवली

देवनार आधुनिकीकरण टेंडरमधील सल्लागाराला दुसऱ्या एका प्रकरणात अशाच प्रकारे संगनमत करून टेंडर भरण्याच्या प्रकाराबाबत सीसीआय या यंत्रणेने १.५२ कोटी रुपये दंडात्मक कारवाई केली होती. अशा दंडात्मक कारवाई झालेल्या सल्लागार कंत्राटदाराकडून मुंबई महापालिकेने लेखी खुलासा घेणे नियमानुसार आवश्यक होते. मात्र संबंधित सल्लागार कंत्राटदाराराने अशा प्रकाराचा खुलासा मुंबई महापालिका प्रशासनास सादर केलेला नाही. ही गंभीर बाब असतानाही मुंबई महापालिकेने सल्लागाराला कारणे दाखवा नोटीस देण्याव्यतिरिक्त कोणतीही कारवाई केलेली नाही.

Deonar Abattoir
पुणे महापालिकेने सुरक्षा रक्षकांसाठी काढले तब्बल ४२ कोटींचे टेंडर

या प्रकरणी भाजप पुन्हा आक्रमक झाली असून सल्लागार कंत्राटदारावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी पामहालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे. महापालिका प्रशासनाने या संगनमताची चौकशी करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com