मुंबईला लुटतेय कोण?; 12000 कोटींच्या घोटाळ्याचा काँग्रेसचा आरोप

BMC
BMCTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबईतील रस्त्याच्या कामात मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) गेल्या पाच वर्षात १२ हजार कोटींचा खर्च केला आहे. मुंबईकरांना दरवर्षी खड्ड्यांच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे मुंबईला नेमके कोण लुटतेय याची सीबीआय चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी कॉंग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी केली. राज्य सरकार सीबीआय चौकशी करण्यासाठी इच्छाशक्ती दाखवणार का असा सवालही देवरा यांनी केला आहे. एक सुजाण मुंबईकर म्हणून सर्वात श्रीमंत महानगरपालिकेला नेमक कोण लुटतंय ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी असेही देवरा म्हणाले आहेत.

BMC
मुंबई पालिकेभोवती चौकशीचा फास, कॅगकडून विशेष ऑडिट होणार; शिवसेना..

मुंबई महापालिका १२ हजार कोटींच्या व्यतीरिक्त दरवर्षी रस्ते दुरूस्तीसाठी, खड्डे भरण्यासाठी तसेच कोल्डमिक्स यासारख्या गोष्टींसाठी दरवर्षी ४५ कोटी अतिरिक्त मोजते. महापालिकेने २०१७-२२ या पाच वर्षांच्या कालावधीत २२५ कोटींचा खर्च केला असल्याचा दावा देवरा यांनी केला आहे. मुंबई महानगरपालिकेने २०१७ ते २०२२ या कालावधी मुंबईच्या रस्त्यांवर १२ हजार कोटी रूपये खर्च केले आहेत. ही रक्कम म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या १० टक्के इतकी आहे. मुंबईतल्या या रस्ते घोटाळ्याची चौकशी करण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. मुंबईत १२ हजार कोटींचे रस्त्यांचे काम झाले, यावर कोणी विश्वास ठेवू शकेल का ? असा सवाल देवरा यांनी केला आहे.

BMC
पुणे महापालिकेने सुरक्षा रक्षकांसाठी काढले तब्बल ४२ कोटींचे टेंडर

मुंबईतील खड्ड्याच्या सुनावणीसाठी उच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यासाठी सहमती दर्शवली आहे. मात्र सत्य बाहेर येण्यासाठी सखोल चौकशी होणे आहे. गेल्या पाच वर्षात मुंबईकरांचा हा पैसा कोणी लुटला हे जाणून घेणे गरजेचे आहे. तसेच मुंबईकरांच्या कष्टाचे पैसे हे कोणी लुटले याची चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने द्यायला हवेत अशीही मागणी देवरा यांनी केली. महाराष्ट्र सरकारला सीबीआय चौकशी करण्याचे आणि महापालिकेतील भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचे आदेश देण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण महाराष्ट्र सरकारची सीबीआय चौकशी लावण्याची राजकीय इच्छाशक्ती आहे का ? असाही सवाल त्यांनी केला. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार थांबवल्याचा फायदा हा सर्वसामान्य मुंबईकरांना होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी सुजाण नागरिक म्हणून पारदर्शकता आणण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा असेही देवरा म्हणाले.

मुंबईच्या रस्त्यांवर झालेला खर्च
वर्ष --- रक्कम
२०१७-१८ - २३०० कोटी
२०१८-१९ - २२५० कोटी
२०१९-२० - २५६० कोटी
२०२०-२१ - २२०० कोटी
२०२१-२२ - २३५० कोटी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com