विनाटेंडर ठेकेदारावर 35 कोटींची दौलतजादा करणारे 'ते' अधिकारी कोण?

BMC
BMCTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेने (BMC) मालाड, मालवणी व जोगेश्वरी येथील नाल्यावर पूल बांधण्याचे ३५ कोटींचे काम टेंडर (Tender) शिवायच दिले आहे. या कामामध्ये ब्यूकॉन इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी विशेष मर्जी बहाल केल्याचे दिसून येते. यानिमित्ताने पुन्हा एकदा मुंबई महापालिकेतील अधिकारी आणि ठेकेदारांमधील (Contractor) करप्ट प्रॅक्टिस अधोरेखित झाली आहे.

BMC
डॉ. खेमणार कारवाई कराच; ठेकेदार धार्जिणे 'ते' 5 अधिकारी कोण?

मुंबई शहर व उपनगरातील जीर्ण झालेल्या पुलांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पश्चिम उपनगरातील तीन पूल व दोन पादचारी पूल पाडून त्याठिकाणी नव्याने पूल बांधण्यासाठी सप्टेंबर 2019 मध्ये बूकॉन इंजिनिअर्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला टेंडर देण्यात आले. त्यानुसार 31 कोटी 83 लाख रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मंजूरी दिली होती. या कामाचा कंत्राट कालावधी 24 महिने इतका होता. हे काम 1 ऑक्टोबर 2019 पासून सुरू झाले. या पुलांपैकी तीन वाहतूक पूल आणि एका पादचारी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. तर एका वाहतूक पुलाचे काम प्रगतीपथावर आहे.

BMC
नागपुरात ZP सदस्य अन् ठेकेदार भिडले; या कारणामुळे बाचाबाची...

ही कामे करणार्‍या ब्यूकॉन इंजिनिअरींग अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला मालवणीला जोडणार्‍या लगून रोड आणि महाकाली नाल्यावर मालाड रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी दोन वाहतूक पूल आणि जोगेश्वरी पूर्व येथील मजास नाल्यावर एक वाहतूक पूल बांधण्याचे कामही देण्यात आले. मात्र, सुमारे 35 कोटी 39 लाख 64 हजारांचे हे काम टेंडर न काढताच देण्यात आले आहे.


BMC
आदित्य ठाकरे ऍक्शन मोडमध्ये; याठिकाणी जाणार...

मालाड मालवणी नाल्यावरील पूल :
पुलाची लांबी : 19.70 मीटर
पुलाची रुंदी : 17.70 मीटर
पुलाचे बांधकाम व रस्त्याचे काम : आरसीसी पाईल्स व डांबरीकरण

मालाड पश्चिम महाकाली नाल्यावरील पूल :
पुलाची लांबी : 24.92 मीटर
पुलाची रुंदी : 18.30 मीटर

जोगेश्वरी पूर्व मजास नाल्यावरील वाहतूक पूल :
पुलाची लांबी : 16.85 मीटर
पुलाची रुंदी : 09.00 मीटर
पुलाचे बांधकाम व रस्त्याचे काम : आरसीसी स्लॅब व डांबरीकरण

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com