नीरव मोदीच्या 2100 कोटींच्या 'त्या' प्रॉपर्टीचा होणार लिलाव

Nirav Modi
Nirav ModiTendernama

मुंबई (Mumbai) : पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेल्या हिरा व्यापारी नीरव मोदी (Nirav Modi) यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचे आदेश कर्जवसुली लवादाने (डीआरटी-आय) दिले आहेत. त्यानुसार सुमारे २,१०० कोटींहून अधिक किंमत असलेल्या मरोळ येथील एचसीएल हाऊसचा लिलाव करण्यात येणार आहे.

Nirav Modi
दहिसर टू मीरा रोड अवघे १२ मिनिटांत होणार शक्य; २ हजार कोटींचे बजेट

मुंबई डीआरटी-आयने दिलेल्या आदेशानुसार, फरार नीरव मोदीच्या एचसीएल हाऊसचा लिलाव पुढील महिन्यात 23 सप्टेंबरला करण्यात येणार आहे. यात सहभागी होणाऱ्यांना किमान 52 कोटींची बोली लावावी लागणार आहे, त्यापासून पुढे एचसीएल हाऊसचा लिलाव सुरु होणार आहे. नीरव मोदीकडे पंजाब नॅशनल बँक आणि 15 अन्य बँकांची सुमारे पाच हजार कोटींहून अधिक थकबाकी आहे. संबंधित लिलावाची घोषणा ही आयकर अधिनयम, 1961 च्या दुसऱ्या अनुसूचीमधील नियम 38, 52 (2) आणि बँक आणि वित्तीय संस्था, 1993 या नुसार करण्यात आली आहे. हे प्रकरण पीएनबी आणि 15 सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील बँका विरुद्ध नीरव मोदीची समूह कंपनी असणाऱ्या फायरस्टार इंटरनॅशनल लिमिटेड आणि इतर ज्ञात किंवा नवीन संस्थांशी संबंधित आहे ज्यांच्याकडून थकबाकी वसूल करण्यायोग्य आहे.

Nirav Modi
मुंबई : रस्त्यांच्या ५८०० कोटींच्या टेंडरसाठी २५ कंपन्यांत स्पर्धा

पंजाब नॅशनल बँकेच्या तक्रारीनंतर केंद्रीय तपास यंत्रणेने जानेवारी 2018 मध्ये पहिला गुन्हा दाखल केला. त्यानंतर ईडी, आयकर विभाग आणि इतर तपास यंत्रणांनी मोदी, मेहुल चोक्सी आणि बँकेचे अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. फायरस्टार इंटरनॅशनल लिमिटेड या समुहामध्ये फायरस्टोन ट्रेडिंग प्रा. लिमिचेड, एएनएम प्रा. लिमिटेड, एनडीएम एंटरप्रायजेस याशिवाय नीशल ट्रेडिंग अशा अनेक कंपन्याचा समावेश आहे. ईडीने मेहुल चोक्सीच्या मालमत्तांवर याआधीच टाच आणली आहे. मेहुल चोकसीची तब्बल 1217 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. यामध्ये मुंबईतल्या 41 मालमत्ता ईडीने जप्त केल्या. या मालमत्तांमध्ये 15 आलिशान फ्लॅट आणि 17 कार्यालयांचा समावेश आहे. याशिवाय हैदराबादमधील ऑफिस, कोलकात्यातला शॉपिंग मॉल, अलिबामधील फार्म हाऊस आणि 231 एकर जमीनही जप्त करण्यात आली. त्याशिवाय, ईडीने मेहुल चोक्सीचे 72 कोटी 80 लाख रुपयांचे शेअर्स गोठवले आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com