रेल्वेची 'ती' ४५ एकर जमीन महिन्यात देणार; १८ वर्षांपासून रखडलेल्या

Ashwini Vaishnav
Ashwini VaishnavTendernama

मुंबई (Mumbai) : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा पुनर्विकास प्रकल्प गेल्या अठरा वर्षांपासून रखडला आहे. ज्या कारणामुळे हा प्रकल्प रखडला आहे ती धारावी प्रकल्पासाठी आवश्यक असलेली रेल्वेची ४५ एकर जमीन राज्य सरकारला महिनाभरात हस्तांतरित करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहे, त्यामुळे आता या प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता आहे.

Ashwini Vaishnav
इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतींबाबत गडकरींची मोठी घोषणा; 2023मध्ये...

या प्रकल्पासाठी धारावी अधिसूचित क्षेत्राशेजारील रेल्वेची ९० पैकी ४५ एकर जमीन राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाकडून खरेदीने अधिग्रहित केली आहे. या जमिनीची रक्कमही सरकारने रेल्वेला जमा केली आहे. त्यानंतरही केंद्र सरकारने राज्याकडे जमीन हस्तांतरित केली नव्हती, यामुळे पुर्नविकास टेंडर काढण्यात अडचण निर्माण झाली आहे. या प्रश्नी खासदार राहुल शेवाळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन ४५ एकर जमीन राज्य सरकारला हस्तांतरित करण्याची मागणी केली. यावर रेल्वेमंत्र्यांनी एका महिन्यात राज्य सरकारला संबंधित जमीन हस्तांतरित केली जाईल, अशी ग्वाही दिली आहे.

Ashwini Vaishnav
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन; पाहणीसाठी खुद्द रेल्वेमंत्री 'बीकेसी'त

धारावीतील जनतेचे जीवनमान उंचाविण्यासाठी राज्य सरकारने २००४ मध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा शासन निर्णय काढला. तेव्हापासून धारावी प्रकल्पाकरिता अनेकदा जागतिक स्तरावर टेंडर काढण्यात आले. मात्र, ही टेंडर पूर्णत्वास जावू शकली नाहीत. त्यामुळे आता खासदार राहुल शेवाळे यांना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आश्वासन दिल्याने धारावी प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता वाढली आहे. १८ वर्षांहून अधिककाळ हा प्रकल्प रखडला आहे. २८ नोव्हेंबर २०१८ रोजी काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत यशस्वी झालेल्या सेकलिंक कंपनीला ७ फेब्रुवारी २०१९ रोजी देकार पत्र मिळणे आवश्यक होते. मात्र, त्याऐवजी पुन्हा नव्याने टेंडर काढण्याचा निर्णय झाला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com