'या' कारणांमुळे मुंबईकरांची माहीम, माटुंग्याला सर्वाधिक पसंती

Mahin, Matunga
Mahin, MatungaTendernama

मुंबई (Mumbai) : महानगरातील जगण्याच्या रहाटगाडग्यात छोटेसे का होईना पण स्वत:च्या मालकीचे घर असावे, हे स्वप्न उराशी बाळगून लाखो मुंबईकर रोज घड्याळाच्या काट्यावर धावत असतात. जमिनीला आलेल्या सोन्याच्या भावामुळे घरांच्या किंमती आकाशाला भिडलेल्या आहेत. तरी सुद्धा सध्या मुंबईतील माहीम आणि माटुंगा ही ठिकाणे मुंबईकरांच्या हक्काच्या घर खरेदीसाठी सर्वाधिक पसंतीची ठरत आहेत.

Mahin, Matunga
स्पाॅट पंचनामा : अडीच कोटींच्या शिवसृष्टीत निकृष्ट साहित्याचा वापर

या भागातील प्रॉपटीं ट्रेंडनुसार घरांच्या किंमती वाढत असून, ‘नाइट फ्रँक’च्या आकडेवारीनुसार जूनमध्ये 5 कोटी ते 20 कोटी या उच्च किंमतीच्या घरांची सर्वाधिक नोंदणी मध्य मुंबईत नोंदविण्यात आली आहे. समुद्राचे सुंदर दृश्य, विमानतळ, रुग्णालय, शाळा या परिसरातून हाकेच्या अंतरावर आहेत, असे रॉकफोर्ड ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र शाह यांनी सांगितले.

Mahin, Matunga
सत्ताबदल होताच बुलेट ट्रेनचे टेंडर सुसाट; साडेचार वर्षांतच...

क्रेडाई, एमसीएचआय, कॉलिअर्स आणि सीआरई मेट्रिक्स यांच्या संयुक्‍त विद्यमाने आणि सपोर्ट रिसर्च रिपोर्टच्या मदतीने करण्यात आलेल्या एमएमआर हाऊसिंग अपस्टिक या अहवालानुसार मुंबई शहरात 12,023 घरे विकली गेली आणि मुंबई उपनगरांमध्ये 65,114 घरांची विक्री झाली.

Mahin, Matunga
पुणे-बेंगळुरू 'ग्रीनफिल्ड'मुळे प्रवास ५ तासांनी कमी; विमानासाठीही

मायक्रोमार्केटच्या महत्त्वाबद्दल सुमित वूड्स लिमिटेडचे संचालक भूषण नेमळेकर म्हणाले, नामांकित शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि लोअर परळ, वरळी, तसेच प्रभादेवी या व्यावसायिक केंद्रांपासून हा परिसर खूप जवळ आहे. त्यामुळे नागरिकांकडून वास्तव्यासाठी माहीम आणि माटुंग्याला प्राधान्य देण्यात येत आहे.

मायानगरी मुंबईत स्वतःचे हक्काचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. असे घर खरेदी करताना लोकेशनही तितकेच महत्वाचे ठरते. त्यामुळे माहीम आणि माटुंगा या ठिकाणच्या घरांना सर्वाधिक पसंती मिळते आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com