जालना रस्त्यावरील 'तो' जीवघेणा खड्डा आणखी किती बळी घेणार?

Jalna Road Pothole
Jalna Road PotholeTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आलेल्या जालना रस्त्यावरील जळगाव टी उड्डाणपुलालगत जालनारोड - ते एसटी काॅलनीला जोडणाऱ्या वळणमार्गावरच भूमिगत गटारीच्या आरसीसी पाइपाला खिंडार पडून मोठे भगदाड पडले आहे. मात्र एमएसआरडीसीचे (MSRDC) अधिकारी आणि मे. जेएमसी प्रोजेक्ट (इंडिया) हा मुंबईचा कंत्राटदार (Contractor) आणि त्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना हा जीवघेणा खड्डा बुजविण्याची आवश्यकता वाटत नाही हे विशेष.

Jalna Road Pothole
राज्याचा मेकओव्हर करणाऱ्या 'या' ३६ प्रकल्पांवर थेट सीएमओचे लक्ष

उड्डाणपुलाखालून जालना रोड ते एसटी काॅलनी मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या मधोमध गेल्या पाच वर्षांपासून हा खड्डा पडलेला आहे. अनेक तक्रारी व मागणी करूनही खड्डा बुजविला गेला नाही. यामुळे आजतागायत 'जैसे थे' आहे. या जीवघेण्या खड्ड्यासह ५६ कोटी २५ लाख रूपये तयार करून बांधलेल्या उड्डाणपुलावरील धावपट्टी व अप्रोच रस्त्यांच्या दुरूस्तीकडे एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता दिलीप साळुंके, अधीक्षक अभियंता सुरेश अभंग, उप अभियंता अशोक इंगळे यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. मोठी दुर्घटना घडल्यानंतरच पुलाच्या डागडूजीकडे लक्ष देणार काय? असा सवाल टेंडरनामाच्या पाहणीत उपस्थित होत आहे.

Jalna Road Pothole
एकनाथा, माऊलींच्या 'या' अनाथ उद्यानाचे 'नाथ' व्हा आता! कारण...

खड्डे चुकविण्याच्या नादात मागील सहा महिन्यांत एका सहा वर्षांच्या चिमुकलीसह पाच लोकांचे बळी गेले आहेत. दिवसेंदिवस अशा घटना वाढत आहेत. पावसाळ्यात वाहत्या व साचलेल्या डबक्यात खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे अपघात वाढत आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com