टेंडरनामाच्या वृत्ताची शहर अभियंत्यांकडून गंभीर दखल; ठेकेदारांना..

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : काही वर्षांपूर्वी जुन्या मुकुंदवाडी गावातील गणपती विसर्जन विहीरीतील गाळ, कचरा आणि निर्माल्य काढताना चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असताना कंत्राटदारांकडून चालू वर्षी देखील विसर्जन विहिरींची स्वच्छता करताना कर्मचाऱ्यांना सुरक्षासाधने पुरविण्यात आली नव्हती. यावर टेंडरनामाने मागील घटनेचा दाखला देत अत्यंत अभ्यासात्मक वृत्त प्रकाशित केले होते. सदर वृत्ताची दखल घेत महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी गंभीर दखल आहे. कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे कर्मचार्यांच्या जीवाची चिंताही व्यक्त करत त्यांनी अखेर सर्व कंत्राटदारांना तातडीने जीवरक्षक साधनांची पूर्तता केल्याशिवाय कर्मचाऱ्यांकडून विसर्जन विहिरींची स्वच्छता करण्यात येऊ नये असा त्यात उल्लेख आहे.

Aurangabad
तगादा : दूषित पाणी आपल्या दारी! औरंगाबाद महापालिकेला झाले तरी काय?

जुन्या मुकुंदवाडी गावात घडलेल्या घटनेचा दाखला देत टेंडरनामाने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताला शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी देखील दुजोरा दिला आहे. शहरातील विविध भागातील गणपती विसर्जन विहिरींची स्वच्छता करताना कर्मचाऱ्यांना कुठलेही जीवरक्षक सुरक्षासाधने न देता कंत्राटदारांमार्फत स्वच्छतेचे काम सुरू असल्याचा पर्दाफाश टेंडरनामाने सचित्र प्रसिद्ध करताच पानझडे यांनी वृत्ताची गंभीर दखल घेतली आहे.

Aurangabad
तहान लागल्यावर विहीर खोदणार का?; टंचाईची कामे फायलीतच

प्रसिद्ध केलेल्या टेंडरमधील अटी-शर्तीनुसार वर्क ऑर्डरमध्ये तसे निर्देश देऊनही स्वच्छता कर्मचाऱ्यांना जीवरक्षक साधने का दिली गेली नाहीत, असा सवाल करत पानझडे यांनी कंत्राटदारांना जाब विचारला आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. विसर्जन विहीरींची स्वच्छता करताना कर्मचाऱ्याच्या जीवास काही धोका पोहोचल्यास याला सर्वस्वी जबाबदार आपण राहणार असाही नोटीसीत उल्लेख करण्यात आला आहे. यासंदर्भात त्यांनी कार्यकारी अभियंता भागवत फड, राजीव संधा, आर. ई. पंडीत तसेच प्रभाग अभियंता राजेश वाघमारे , के. एन. काटकर, एस. एस. रामदासी, मधुकर चौधरी यांना देखील कंत्राटदारांकडून होत असलेल्या स्वच्छतेच्या कामावर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com