बाप्पा पावला औरंगाबादकरांच्या मदतीला धावला!प्रशासकांचा मोठा निर्णय

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : अखेर औरंगाबादकरांना खड्ड्यातून मुक्त करण्यासाठी बाप्पा पावला असून त्याच्या आगमनाच्या आदल्या दिवशीच शहरातील गणेश विसर्जन मार्गावरील प्रमुख रस्त्यांवर खड्डे बुजविण्यासाठी महापालिका प्रशासक आणि शहर अभियंता यांनी तीन कोटी रुपयांच्या आणि विसर्जन विहिरीतील गाळ काढण्यासाठी ५० लाख रुपयांच्या खर्चाला मुभा दिली आहे.

Aurangabad
रस्त्यांवरील खड्ड्यांत यमराज!; मनपासह संबंधित विभागापुढे लावणार...

गणरायाच्या आगमनापुर्वी महापालिका प्रशासक डाॅ.अभिजित चौधरी आणि शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्या या चांगल्या निर्णयाने आता बाप्पाच्या आगमनाच्या निमित्ताने निदान प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्ते गुळगुळीत होणार असल्याने खड्ड्यातून प्रवास करणाऱ्या औरंगाबादकरांना आता दिलासा मिळणार आहे. मात्र इतक्या कोटीतून होणाऱ्या कामासाठी निश्चित केलेल्या कंत्राटदारावर विसंबून न राहता महापालिका प्रशासकांनी आणि शहर अभियंत्यांनी स्वतः लक्ष ठेऊन कार्यकारी अभियंता, प्रभाग अभियंता, उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंता आदी यंत्रणेकडून कंत्राटदाराकडून उत्कृष्ठ काम करून घेणे महत्वाचे आहे.

शहरातील काही प्रमुख मार्गांवरील खड्डे बुजविण्यासंदर्भात 'टेंडरनामा'ने सातत्याने प्रश्न उपस्थित केले. मात्र पॅचवर्कसाठी अंदाजपत्रक सादर केले आहे, निधी अभावी काम अडकल्याचे प्रभाग अभियंत्यांकडून सांगण्यात येत होते. परिणामी खड्ड्यासंदर्भात ओरड होताच प्रभाग अभियंते खड्डे बुजविण्यासाठी डांबर, सिमेंटचा वापर न करता माती, मुरूम आणि डेब्रीजने खड्ड्याची बुजवाबुजवी करत असत. मात्र पाऊस येताच खड्डे उघडे पडत असल्याने त्याचा फारसा उपयोग होत नसे.

Aurangabad
गंगापूर धरणातून सातपूरसाठी 200 कोटीची थेट पाईपलाईन; आता पाणीपुरवठा

विशेष म्हणजे गणरायाचे आगमन जवळ येऊन ठेपलेले असताना देखील महापालिकेची खड्डे बुजविण्यासाठी तयारी होत नव्हती. यावर 'टेंडरनामा' प्रतिनिधीने गणरायाचे आगमन देखील खड्ड्यातून होणार का, असा सवाल केला. त्यानंतर महापालिका प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता भागवत फड यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व प्रभाग अभियंते आणि स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि. नोडल अधिकारी इम्रान खान तसेच ए. जी. कन्सट्रक्शनचे अभियंते यांच्यासोबत तातडीने बैठक घेतली. खड्डे बुजविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. यासाठी महापालिकेने पुण्यातील ब्लॅक गोल्ड ट्रेडर्सकडून २४ लाखात ६२ टन डांबर देखील खरेदी केले. खड्डे बुजविण्यासाठी ए. जी. कन्सट्रक्शन कंपनी निश्चित करण्यात आली आहे.

Aurangabad
फडणवीसांनी अखेर करून दाखविले; मेट्रो-३ची पहिली गाडी धावली...

विसर्जन विहिरींसाठी ५० लाख

तसेच शहरातील ८ विसर्जन विहिरीतीळ गाळ काढण्यासाठी ५० लाख रुपये खर्च केले जात आहेत. हे काम देखील प्रगतीपथावर आहेत. याच निधीतून मंच, साउंड, रंगरंगोटी मंडपाचा खर्च केला जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com