Aurangabad: ई-बसच्या प्रस्तावाला नव्या प्रशासकांनी का लावला ब्रेक?

E Bus
E BusTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद स्मार्ट सिटी (Aurangabad Smart City) प्रकल्पांतर्गत ३५ इलेक्ट्रिक बस (E Bus) खासगी कंपनीकडून भाड्याने घेतल्या जाणार होत्या. त्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत चाचणी देखील करण्यात आली होती. मात्र या इलेक्ट्रिक बस धावण्याआधीच तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पांण्डेय यांच्या प्रस्तावाला नूतन प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनी ब्रेक दिला आहे. ३५ इलेक्ट्रीक बस भाड्याने न घेता आहे, आहे त्या बसेसचा पूर्ण क्षमतेने वापर करा, असे म्हणत त्यांनी इलेक्ट्रीक बसेसच्या प्रस्तावाचा नंतर विचार करू असे, आदेश काढत स्मार्ट सिटीतील खाबुगिरी धोरण आणि जनतेच्या पैशाच्या हेळसांडीला पूर्णविराम दिल्याने औरंगाबादकर या निर्णयाचे स्वागत करत आहेत. (Aurangabad Municipal Corporation)

E Bus
'ऑलेक्ट्रा'ला ३०० ई-बसचे ५०० कोटींचे टेंडर; पाहा कोणी दिले?

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत सुरवातीलाच डिझेलवर चालणाऱ्या १०० बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पातून २०० कोटी खर्च करण्यात आले आहेत. असे असताना शहरात केवळ ३५ बसेस चालू आहेत. इतर बसेस धूळखात उभ्या आहेत. मात्र शहराचे वाढते प्रदूषण कमी करण्यासाठीचा मुद्दा उपस्थित करत शासनाने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचे धोरण स्वीकारल्याचे कारण जोडत तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या काळात स्मार्ट सिटीतर्फे ३५ इलेक्ट्रिक शहर बस भाड्याने घेण्यासाठी टेंडर प्रसिद्ध करण्यात आले होते. टेंडरमध्ये तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरलेल्या एका एजन्सीकडून सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्ट या त्रयस्थ संस्थेमार्फत चाचणी देखील घेण्यात आली होती. त्यात बॅटरीची क्षमता, चार्जिंगची यंत्रणा व अन्य तांत्रिक बाबींची माहिती घेण्यात आली होती.

E Bus
मुंबई महापालिकेचे जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी २९ कोटींचे टेंडर

या इलेक्ट्रीक बस शहरातील वर्दळीच्या रस्त्यावरून धावण्याआधीच नवनियुक्त प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ डाॅ. अभिजित चौधरी यांनी सोमवारी शहर बसेसचा आढावा घेतला. त्यात सद्यःस्थितीत १०० पैकी केवळ ३५ शहरबस रस्त्यावर धावत असल्याचे समोर येताच त्यांनी नव्याने ३५ इलेक्ट्रीक बस भाड्याने न घेता, आहे त्या बसेस पूर्ण क्षमतेने चालवण्याचे आदेश देत प्रस्ताव खंडीत केला. एवढेच नव्हे, तर डबल डेकर बसेसचा प्रस्ताव देखील थांबवला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com