मुख्यमंत्री शिंदे नांदेड जिल्ह्यावर प्रसन्न! तब्बल 192 कोटींच्या..

Eknath Shinde
Eknath ShindeTendernama

नांदेड (Nanded) : नांदेड शहराच्या विस्तारामुळे उत्तर नांदेड अर्थात तरोडा, वाडी या भागाचे मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले आहे. अर्ध्या तासाच्या अंतरावर पुर्णासारखे मोठे रेल्वे जंक्शन, वसमतसारखी मोठी कृषी बाजारपेठ व इतर कृषी क्षेत्रात परिपूर्ण असलेल्या गावांचे अंतर लक्षात घेता पुर्णा, हिंगोली रस्ते विकासासाठी 192 कोटीची तरतूद करण्यात आली आहे, त्यामुळे या भागातील वाहतूक सुलभ होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

Eknath Shinde
मुंबई मेट्रो-३ : पहिली ८ डब्यांची प्रोटोटाईप ट्रेन यशस्वी

नांदेड महापालिकांतर्गत शहरातील उत्तर मतदारसंघातील मुलभूत सुविधा, हिंगोली जिल्हा सीमा ते आलेगाव-निळा-नांदेड व परभणी जिल्हा सीमा ते पूर्णा नांदेड रस्त्याचे दुपदरीकरण, आसना नदीवरील पासदगाव जवळील नवीन पुलाच्या कामाचे प्रातिनिधीक भूमिपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. येथील भक्ती लॉन्स येथे झालेल्या या समारंभास खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत व इतर मान्यवर उपस्थित होते.

Eknath Shinde
मुंबई महापालिकेचे जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी २९ कोटींचे टेंडर

पासदगावजवळील पूल हा दरवर्षी पुराच्या पाण्याने वेढला जातो. पुलावरून मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत असल्याने ते ओसरेपर्यंत या रस्त्यावरची वाहतूक खोळंबून राहते. सध्या आहे त्या पुलाऐवजी नवीन पुलाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. राज्य शासनाच्या हायब्रीड ॲन्युटी धोरणाअंतर्गत परभणी जिल्ह्यातून नांदेडकडे येणाऱ्या पोखर्णी (परभणी)-बोरवड-लिंबाळा-ताडकळस-पुर्णा ते नांदेड या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. हा रस्ता नांदेड जिल्हा सीमेपर्यंत आहे. मात्र या सीमेपासून नांदेड शहरापर्यंत रस्ता अधिक चांगला होणे बाकी होते. याचीही सुधारणा करणे व हायब्रीड ॲन्युइटीच्या धर्तीवर हा उरलेला मार्गही पूर्ण करणे आवश्यक होते. याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातून नांदेडकडे येणाऱ्या उमरा-सोडेगाव-बोल्डा-कुरुंदा-वसमत ते नांदेड हा जिल्हा सीमा रस्ता प्रगतीपथावर आहे. याही रस्त्याचे काम नांदेडच्या जिल्हा सीमेपर्यंत मर्यादित होते. नांदेड शहर याला चांगल्या मार्गाने जोडल्या न गेल्यामुळे या वाहतुकीला मोठा आडथळा निर्माण झाला होता. याची सुधारणा करणे अत्यंत आवश्यक होते. या तीनही कामांमुळे वाहतूक सुविधेत मोठी सुलभता आता येणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com