ग्राम सडक योजनेतील दोन कोटींच्या रस्ता देखभालीकडे ठेकेदाराची पाठ?

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत औरंगाबाद तालुक्यांतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ जुना बीडबायपास ते आडगाव-चिंचोली या रस्त्याचे काम अल्पावधीत उखडले. त्यामुळे ठेकेदाराने ते देखभाल-दुरूस्ती अंतर्गत करणे अपेक्षित असताना दुरूस्तीकडे पाठ दाखवल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. यासंदर्भात टेंडरनामाने ठेकेदाराला जाब विचारला असता सदर रस्त्याचा देखभाल-दुरूस्तीचा कालावधी संपला आहे. या मार्गावर गौणखनिजाच्या अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने कितीही चांगली रस्ता केला तरी तो तग धरणार नाही, असे त्याचे म्हणणे आहे.

Aurangabad
औरंगाबादकरांना मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा; 200 कोटींचा निधी

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत तयार केलेला हा रस्ता वर्षभरातच उखडला आहे. याचे पुरावे देत आडगाव, झाल्टा आणि चिंचोली येथील ग्रामस्थांनी जवळपास सहा किलोमीटरचा हा रस्ता दुचाकीवरून दाखवत चांगलाच संताप व्यक्त केला. फुलंब्री मतदार संघांतर्गत येणार्ये या रस्त्याबाबत येथील ग्रामस्थांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष व विद्यमान आमदार हरीभाऊ बागडे नाना यांच्यापुढे देखील कैफियत मांडली या रस्त्याच्या निकृष्ट कामांचा मुद्दा उपस्थित केला. मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही.

Aurangabad
औरंगाबाद : 'त्या' अभियंता, ठेकेदाराच्या कामावर न्यायालय संतप्त

विशेष म्हणजे ६ डिसेंबर २०१८ रोजी ठेकेदाराला या रस्त्याच्या विशेष दुरूस्तीसाठी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. ५ जानेवारी २०१९ पर्यंत रस्त्याचे काम पुर्ण करावयाची अट होती. मात्र ठेकेदाराने काही ठिकाणी पुल व मोर्या करून रस्त्याचे काम अर्धवट सोडून दिले होते. त्यानंतर कामाची मुदत संपल्यानंतर २०२१ मध्ये हा रस्ता थातूरमातूर पध्दतीने तयार करण्यात आला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सद्य:स्थितीत रस्त्यावरील डांबरी सीलकोट , सह खालच्या थरासह खडीकरण - मजबुतीकरण उघडे पडुन तीन ते चार फुटाचे मोठमोठे भगदाड पडल्याचे टेंडरनामा पाहणीत उघड झाले आहे.

Aurangabad
औरंगाबाद पालिकेचा महाप्रताप; आता पॅचवर्कच्या नावाखाली रस्त्यांवर..

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ ते आडगाव-चिंचोली या सहा किलोमीटर लांबीचा रस्ता दुरूस्तीसाठी राज्य सरकारच्या ग्रामविकास प्रधानमंत्री ग्राम विकास योजनेतून एक कोटी ९५ लाख ९७ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. सदर रस्ता दुरूस्तीसाठी औरंगाबादचे अमन कन्सट्रक्शन कंपनीचे जाॅनी शेख यांना काम देण्यात आले होते. यावर देखरेखीसाठी महाराष्ट्र ग्रामीन विकास स्स्थेंतर्गत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील उप अभियंता उन्मेश लिंबारे यांच्याकडे जबाबदारी टाकली होती. मात्र रस्ता पुर्ण होण्याअगोदरच त्यावर खड्डे पडल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

अधिकारी - ठेकेदाराची अशी ही 'शाळा'

पीएनजेएसवाय अंतर्गत केलेले रस्ते देखभाल दुरुस्तीच्या ५ वर्षांच्या कालमर्यादेत येतात. मात्र, या रस्त्याला केवळ तीन वर्षांचा अवधी दिला गेला. मात्र कार्यारंभ आदेश आणि काम पुर्णत्वाच्या कालावधीनंतर तब्बल दोन वर्षांनी केलेला रस्ता खराब झाला. आता देखभाल - दुरूस्तीचा कालावधी शिल्लक असताना ठेकेदार -अधिकारी कालावधी संपल्याचा खोटा दावा करत आहेत. असा अतिशय गंभीर आरोप करतांना ठेकेदारांने काम कधी सुरू केले आणि कधी पुर्ण केले, याचे तारखेसह फोटो ग्रामस्थांनी टेंडरनामा प्रतिनिधीकडे दिले. तातडीने रस्ता दुरूस्त करावा अशी पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थांची मागणी आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com