प्रशासक साहेब, तुमच्या कक्षाशेजारील नालासफाईकडे लक्ष द्या?

Aurangabad

Aurangabad

Tendernama

औरंगाबाद (Aurangabad) : महापालिकेच्या शेजारी असलेल्या नुर कॉलनीच्या नाला गाळ, कचरा, जलपर्णी आणि कचऱ्याने तुडुंब भरला आहे. नाल्यात आकाशाला गवसनी घालणारी जलपर्णी उभी आहे. विशेष म्हणजे कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने नाला सफाईच्या टेंडरमधील अटी व शर्तीं धाब्यावर बसवत वर्षानुवर्ष नाल्याच्या काठावरच गाळाचे डोंगर तसेच ठेवल्याने त्यावर रानटी झाडेझुडपे आणि कचऱ्याचे ढिग साचले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे याच गाळाचे सपाटीकरण करून नाल्याच्या काठावर अनधिकृतपणे प्लॉटींग केल्याचे दिसत आहे.

Aurangabad

मुंबई ते नवी मुंबई अंतर अवघ्या काही मिनिटांत करा पार..

महापालिकेच्या शेजारीच दलदल...

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या टप्पा क्रमांक एक, दोन आणि टप्पा क्रमांक तीनच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या अगदी पाठीमागेच हाकेच्या अंतरावर असलेल्या नाल्याची ही अवस्था आहे. त्यामुळे शहरातील लहानमोठ्या ११२ किलोमीटर लांबीच्या नाल्यांची काय अवस्था असेल असा प्रश्न उपस्थित होणे साहजिकच आहे. हा नाला गाळ, कचरा आणि रानटी झाडाझुडपांसह अतिक्रमणांनी तुडुंब भरला आहे.

प्रशासक तूम्ही सुध्दा?

होय, प्रशासक साहेब तूम्ही आणि तूमच्या यंत्रणेच्या नाकावर टिच्चून अनेक समस्यांनी तुडुंब भरलेल्या नाल्याकडे तुमचे आणि तूमच्या पालिकेच्या महामहीम यंत्रणेचे मात्र अद्याप लक्ष गेलेले नाही. याचाच अर्थ असा पावसाळा तोंडावर असताना शहरातील नालेसफाईकडे अद्याप आपले लक्ष नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Aurangabad

शिवाजीनगर मार्ग; भूसंपादनाचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात!

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

महापालिकेची टप्पा क्रमांक तीनची इमारत नूर कॉलनीच्या नाल्यालगत आहे. असे असले तरी टप्पा क्रमांक एक आणि टप्पा क्रमांक दोनच्या इमारतीतून देखील नाल्यातील बकाली दिसते. या इमारतीच्या पाठीमागून एकेकाळी ऐतिहासिक कमळ तलावातून शहराच्या मध्यवर्ती भागातून खळखळून वाहणारी खाम नदीची उपनदी आज मानवी हस्तक्षेपाने नाला झाला.

एकेकाळी खाम नदीची उपनदी

कमल तलावाच्या सांडव्यातून उगम पावलेली ही नदी गुलाबवाडी, अण्णाभाऊ साठेनगर, घाटी, जयभीमनगर, गौतमनगर, बेगमपुरा, आनंदनगरातून महापालिकेच्या टप्पा क्रमांक तीनच्या पाठीमागे वसलेल्या नुर काॅलनी वसाहतीतून खडकेश्वरमार्गे सिध्दार्थ उद्यानाला लागुन लोखंडीपुलालगत खामनदीला मिळाली आहे.

प्रशासक आस्तीककुमार पाण्डेय नाल्यांमध्ये उतरा ; आश्वासने नको

महापालिकेच्या टप्पा क्रमांक तीनच्या पाठीमागेच हा नाला वाहतो आणि नाल्याच्या पलीकडे नूर कॉलनीचा परिसर आहे. महापालिका प्रशासक यांनी वर्षभरापूर्वी शहरातील नाल्याकाठी राहणाऱ्या लोकांचे मत घेऊनच नालासफाईची बिले कंत्राटदारांना अदा करणार असा फतवा काढला होता. यासाठी व्हाॅट्सऍप क्रमांकावर तक्रारी करण्याचे देखील आवाहन केले होते.

Aurangabad

औरंगाबाद 'कर'दात्यांवर दिवसा धूळफेक

स्वतःच्या कक्षाबाहेरील नाला बघा

मात्र, स्वतःच्या कक्षाबाहेरील नुर काॅलनीतील नाला सफाईचे काम करताना कंत्राटदाराने या नाल्यातून काढलेल्या गाळाचे आता डोंगर तयार झाले आहेत. गाळाचे डोंगर स्थलांतरित करण्याचे काम महापालिकेने केलेच नाहीत. त्यामुळे थोडा पाऊस झाला तरी नाल्याच्या काठावरचा गाळ पुन्हा नाल्यात लोटला जात आहे. विशेष म्हणजे सदर नाल्यात वाढलेली जलपर्णी ही नाला सफाई न करता बिल काढल्याचा साक्षी पुरावा आहे. धक्कादायक म्हणजे नालाच्या काठावर टाकलेल्या गाळाचे सपाटीकरण करून प्लॉट तयार केले जात आहेत.

अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर पट्टी

पालिकेच्या इतर कक्षांसह टप्पा क्रमांक तीनच्या इमारतीमधून गाळ, कचरा, जलपर्णी आणि अतिक्रमणाने तुडुंब भरलेला नाला स्पष्टपणे दिसतो. याच इमारतीत अतिक्रमण हटाव विभाग, मालमत्ता विभाग आणि नाला सफाईच्या कामावर नियंत्रण ठेवणारा अभियांत्रिकी विभाग देखील आहे. या तिन्हीही विभागांचे नाल्यावरच्या प्लॉटिंगकडे अद्याप लक्ष गेलेले नाही.

Aurangabad

औरंगाबाद खड्ड्यात; महापालिकेने केली औरंगाबाद खंडपीठाची दिशाभूल

पुरात वसाहती डुबल्यावर लक्ष देणार काय?

जेव्हा या तिन्हीही विभागांचे लक्ष जाईल तेव्हा अनेक समंस्यांनी तुडुंब भरलेल्या नाल्याचे पाणी वसाहतीत शिरेल आणि वसाहत पाण्याखाली येईल तेव्हा महापालिकेला जाग येणार काय? असा सवाल या भागातील नागरिक करत आहेत. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नूर कॉलनीत घराघरात पाणी शिरले होते. नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले होते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना ताजी असताना त्याच नाल्यातील समस्या पाहता केवळ सफाईच्या नावावर बिले उकळल्याचे आता उघड झाले आहे.

प्रशासक साहेब लक्ष द्या

प्रशासक साहेब, जरा नालेसफाईकडे देखील लक्ष द्या. अवकाळी पावसाच्या आगमनापूर्वी अर्थात जानेवारी, फेब्रुवारीत नालासफाई होणे गरजेचे आहे. मात्र अवकाळी पावसात नाल्यातील केरकचरा वाहून गेल्यावर नंतर भर पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी प्रमाणे महानगरपालिकेच्या वतीने नाले सफाईकडे लक्ष देऊन बीले काढण्याचा चमत्कार केला जातो.

शहरातील सर्वेच नाले तुडुंब

शहरातील नुर काॅलनी नव्हेच तर सर्वच भागातील लहान मोठ्या नाल्यात कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नाल्यात असणारे ड्रेनेज चेंबर देखील ब्लॉक झाले आहे, ड्रेनेज सफाई कर्मचारी जोपर्यंत नाल्यातील कचरा साफ होणार नाही, तोपर्यत ड्रेनेज लाईन साफ करता येणारे नाही असा पवित्रा घेतल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. येणारे पावसाळ्याचे दिवस बगता नाल्यात असलेल्या कचऱ्यामुळे पावसाचे पाणी हे वाहून न जाता नागरिकांच्या घरात देखील जाण्याची भीती परिसरातील नागरिकांना आहे. नाल्याकाठी असणाऱ्या भागात महापालिकेची कचरा गाडी येत जात नसल्याने परिसरातील नागरिक कचरा नाल्यात टाकतात. या परिसरात दररोज कचरा गाडी आल्यास नागरिक कचरा नाल्यात टाकणार नाहीत असे नागरिकांचे म्हणणे आहे. येणारे पावसाचे दिवस बगता महानगरपालिका प्रशासनाने त्वरित नालेसफाई करावी जेने करून कोरोना बरोबरच इतर साथ रोगास प्रतिबंध बसेल.

Aurangabad

औरंगाबाद पालिकेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर;याचिकाकर्त्यावर दबाब

भर पावसात खिसे ओले भरण्याचा धंदा?

महापालिका हे भ्रष्टाचाराचे आगार असल्याने मान्सूनपूर्व तयारी हा लोकप्रतिनिधी व नोकरशहांचे खिसे भरण्याचा धंदा बनला आहे. पाऊस सुरू होण्याची वेळ नक्की नसल्याने व प्रशासनातील गलथानपणामुळे योग्य वेळी पावसाची तयारी केली जात नाही. त्यामुळे दरवर्षी पाऊस पडल्यावर शहरवासीयांना तोच त्रास भोगावा लागतो. हे टाळण्यासाठी प्रशासनावर दबाव आणून ठरावीक वेळेत पारदर्शक पद्धतीने मान्सूनपूर्व तयारी जनतेने करून घ्यावी. तिच्यावर माहितीच्या अधिकारामार्फत नियंत्रण ठेवून त्यात पैशांची अफरातफर झाल्यास किंवा अपु-या तयारीमुळे नागरिकांचे नुकसान झाल्यास ते संबंधितांच्या खिशातून वसूल करावे. पुढच्या वर्षापासून आपोआप मान्सूनपूर्व तयारी होईल.

- जनार्देन आगलावे

यंत्रणेवर प्रभावी नियंत्रण आवश्यक

नेमेचि येतो पावसाळा पण स्थिती येरे माझ्या मागल्या हे ठरलेलेच. नाले सफाई, रस्ते सफाई हा फार्स आहे. यामध्ये लाखो रुपयांची सफाई दिसते. पण नाले सफाई उशिरा सुरू होते, काढलेला कचरा, गाळ वेळेत उचलला जात नाही. कामचुकारपणामुळे या यंत्रणेचे तिनतेरा वाजले आहेत. शहरात दिडशे ते दोनशेपेक्षा अनेक वसाहतीत पाणी तुंबते व ६० पेक्षा जास्त ठिकाणी पाणी साचतेच! पाणी साचण्याचे कारण म्हणजे शहरातील रस्त्यालगत पाण्याचा निचरा करणारी कोणतीही योजना अथवा उपाय नाही. त्यामुळे मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी तुंबते! नदीनाल्यातील गाळ काढल्यानंतर त्याची विल्हेवाट कशी लावावी हा प्रश्न अजून सुटलेला नाही. पावसाळ्यात जास्त करून साथीचे प्रमाण वाढते. त्यातून डासांची उत्पत्ती यामुळे मलेरिया, डेंग्यूचा प्रसार लवकर होतो. त्यावर आरोग्य यंत्रणा सज्ज पाहिजे. साचलेल्या पाण्याचा निचरा झाला नाही तर रोग बळावतात. घाणीमुळे आरोग्याला धोका पोहोचतो. त्याकरिता त्वरित विल्हेवाट लागणे गरजेचे आहे. शासन, पालिका, सफाई व आरोग्यावर लाखो रुपयांचा निधी वापरते; परंतु सक्षम जबाबदारीने काम करणारी यंत्रणा नसल्याने हा प्रश्न बिकट होत आहे, परंतु ठेकेदाराचे खिसे मात्र भरत आहेत. हे टाळण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबवून कडक नियंत्रण ठेवणे जरुरीचे आहे.

- विजय सुर्यवंशी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com